Almatti Dam : पुन्हा पुराचे संकट; आलमट्टी धरणातून विसर्ग वाढवा, कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मागणी

Koyna Dam : कोयना, वारणा व राधानगरीसह सर्वच धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने आलमट्टी धरणामधून तीन लाखांचा विसर्ग करावा.
Almatti Dam
Almatti Damagrowon
Published on
Updated on

Kolhapur Flood : कोयना, वारणा व राधानगरीसह सर्वच धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने आलमट्टी धरणामधून तीन लाखांचा विसर्ग करावा. त्यासाठी पाठपुरावा करावा, अशा मागणीचे पत्र कृष्णा महापूर नियंत्रण समितीने कोल्हापूरच्या पाटबंधारे विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांना काल(ता.२७) दिले. त्याची तातडीने दखल घेत ‘आलमट्टी’ व ‘हिप्परगी’चा विसर्ग वाढविण्याबाबत पत्रव्यवहार करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाने दिल्या आहेत.

समितीने पत्रद्वारे दिलेली माहिती अशी की, ‘आलमट्टी’ने कोणत्याही परिस्थितीत तीन लाखांचा विसर्ग करून पाणी पातळी खाली आणावी. दरम्यानच्या काळात हिप्परगी धरणाचे पुन्हा दरवाजे सर्व दरवाजे बंद करून केवळ चार दरवाजे खुले केले आहेत. ते सर्व दरवाजे पूर्ण खुले ठेवण्याचे आदेश द्यावेत.

‘आलमट्टी’मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी येऊनही त्यांनी ११९ मीटर पातळी ठेवली असून, धरणातील पाणी कमी होताना दिसत नाही. ‘आलमट्टी’ व ‘हिप्परगी’च्या मागील कोल्हापूर, सांगलीतील सर्वच धरणे ९० टक्क्यांहून अधिक भरली असून, त्यांनाही आता विसर्ग करणे क्रमप्राप्त आहे.

Almatti Dam
Koyna Dam : कोयना धरण ९९ टीएमसी, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ

आलमट्टी धरणाची पाणी पातळी त्यांच्या अहवालात ९८ हजार आवक दाखवत आहे. वास्तविक, १ लाख २७ हजाराने आवक होत आहे. ही बाब राज्य व जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेऊन यावर कायमस्वरुपी पाणीसाठा नियंत्रण ठेवण्याबाबत पाठपुरावा करावा, असेही समितीने पत्रात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com