Bamboo Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Bamboo Cultivation : बांबू लागवड तंत्रज्ञानाचा अभ्‍यासक्रमात समावेश

Bamboo Farming : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची लवकरच कृषी विद्यापीठात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

माणिक रासवे

Parbhani News : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची लवकरच कृषी विद्यापीठात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यात कौशल्‍य विकासावर आधारीत विविध अभ्‍यासक्रम सुरू करण्‍यात येत आहेत.

बांबू लागवड तंत्रज्ञान व फर्निचर निर्मिती याचा त्यात समावेश करण्‍यात येईल. बांबूचा वापर प्राचीन काळी आपण करतच होतो.त्याचप्रमाणे बांबू आधारीत अनेक बाबी आपण करू शकतो.

बदलत्‍या हवामानात अनुकूल सौरऊर्जा आधारीत अॅग्रीपीव्‍ही, शेततळे यासारख्‍या तंत्रज्ञान विकास व संशोधन यावर कृषी विद्यापीठ कार्य करत आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासोबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात शुक्रवारी (ता. १८) आयोजित बैठकीत ते बोलत होते.

या वेळी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, कुलसचिव पी. के. काळे, कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिगंबर पेरके, पीक लागवड खर्च योजनेचे प्रमुख डॉ. सचिन मोरे, प्राचार्य डॉ. व्‍ही. एस. खंदारे, डॉ. आनंद गोरे, डॉ. पी. आर. झंवर, डॉ. हरिश आवारी, डॉ. के. एस. बेग, डॉ. एस. डी. विखे, जे. एल. कातकडे आदी उपस्थित होते.

पाशा पटेल म्‍हणाले, की बदलत्‍या हवामान परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड हा एक चांगला पर्याय आहे. बांबूपासून अनेक वस्‍तू बनवू शकतो, घरातील व कार्यालयातील फर्निचर बनविण्‍याकरिता बांबूला प्रोत्‍साहन दिले पाहिजे. सूत्रसंचालन डॉ. मोरे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT