Paddy Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Issue : संगमेश्वरला भातशेतीत निळे भुंगेरे, करप्याचा प्रादुर्भाव

Kharif Season : श्रावण सुरू झाल्यानंतर पावसाने उघडीप घेतल्यामुळे संगमेश्वर तालुक्यात दोन हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीत निळे भुंगेरे व करप्याचा प्रादुर्भाव झालेला आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : श्रावण सुरू झाल्यानंतर पावसाने उघडीप घेतल्यामुळे संगमेश्वर तालुक्यात दोन हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीत निळे भुंगेरे व करप्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर राजापूर तालुक्यातही काही गावांमध्ये हे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली असून पावसाने अशीच दडी मारल्यास किडरोग वेगाने वाढण्याची भीती व्यक्त केली. जिल्ह्यात सर्वत्रच पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कमी-अधिक प्रमाणात निळे भुंगेरे आणि करपा दिसत आहे.

जुलै महिन्यात पावसाने जोर केल्यामुळे भात पुनर्लागवडीत कोणतीच अडचण आलेली नाही. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप घेतली. सोमवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी ४ मिमी पाऊस झाला आहे. तसेच १ जूनपासून आतापर्यंत सरासरी २७९१.६८ मिमी पाऊस झाला असून, तुलनेत ७७ टक्क्यांहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे भातशेती तरारली आहे;

मात्र ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने उघडीप दिली. गेले चार दिवस कडकडीत ऊन पडल्यामुळे संगमेश्वर, राजापूर तालुक्यांत भात शेतीवर करपा रोगासह निळा भुंगेरा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. संगमेश्वर तालुक्यात धामणी, गोळवली, राजवाडी, वाशीतर्फे संगमेश्वर, कुळ्ये या गावात शेतीवर करपा आढळलेला आहे. काही शेतांमध्ये भाताची रोपे किडींनी फस्त केली आहेत.

काही ठिकाणी रोपे उन्हामुळे पिवळी पडली आहेत. पावसाची स्थिती अशीच राहिली तर भात उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. किडींचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कृषी विभागाकडून तातडीने शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली आहे. निळ्या भुंगेऱ्यांचा अधिक प्रादुर्भाव आहे. तर करपा किरकोळ ठिकाणी आहे. त्यावर अधिकाऱ्यांनी उपाययोजना सुचवलेल्या आहेत. दरम्यान, यंदा जिल्ह्यात ६७ हजार हेक्टरवर भात लागवड झालेली आहे. समाधानकारक पावसामुळे रोपे वाढीला जोर मिळाला आहे.

काही ठिकाणी भातशेतीवर निळ्या भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव झालेला आहे. पाणथळ जमिनीच्या शेतीला सध्याचे वातावरण चांगले आहे. परंतु कातळावरील जमिनीला पावसाची आवश्यकता आहे. अन्यथा शेतकऱ्यांना नुकसानीची झळ बसू शकते.
संतोष भडवळकर, शेतकरी
सध्या ऊन-पाऊस असे वातावरण असल्यामुळे काही ठिकाणी निळ्या भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. कृषी विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी केली असून त्यावर उपायही सुचवलेले आहेत. करपा किंवा तत्सम गोष्टींचा प्रादुर्भाव होत असल्यास तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा.
विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT