Loan Waive Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Incentive Scheme : सातशे मृत शेतकऱ्यांच्या वारसांना प्रोत्साहन अनुदान

Loan Waive Scheme : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत प्रोत्साहनासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वीच निधन झाले. त्यामुळे त्यांना लाभ मिळाला नाही.

Team Agrowon

Yavatmal News : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत प्रोत्साहनासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वीच निधन झाले. त्यामुळे त्यांना लाभ मिळाला नाही. जिल्ह्यात ६९२ शेतकरी मृत आहे. त्यांच्या वारसांना आता लाभ दिला जाणार आहे.

प्रोत्साहन लाभ योजनेमध्ये पात्र ठरलेल्या मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी रक्कम मिळावी, यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. मृत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती योजनेच्या संगणकीय प्रणालीवरून काढून टाकण्यासाठी ९ ते १७ सप्टेंबरपर्यंत बँकांना सुविधा दिली आहे. १८ ते २६ सप्टेंबरदरम्यान वारसांची नोंद करता येणार आहे.

पात्र ठरलेल्या मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्र बँकेकडे जमा करावी लागणार आहे. जिल्ह्यात आधार प्रमाणीकर प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची संख्या एक हजार ३१६ आहे. यात मृत शेतकरी ६९२ आहे. त्यांच्या वारसांना कागदपत्र सादर करून मदत मिळणार आहे.

यासोबत ७५ सभासद परगावी असून ३६ अपात्र झाले आहेत. ११४ शेतकऱ्यांचा संपर्क होत नसून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सहकार विभाग करीत आहे. मृत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आर्णी तालुक्यात मृत शेतकऱ्यांची संख्या ६७ आहे. बाभूळगाव १५, दारव्हा ३, दिग्रस ५, घाटंजी ५७, कळंब १२, केळापूर ४९, महागाव २०, मारेगाव ६७, नेर ८, पुसद ६५, राळेगाव १८, उमरखेड ६२, वणी १५७, यवतमाळ ६६ तर झरीजामणी तालुक्यातील २१ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

प्रोत्साहन निधीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरणापूर्वीच निधन झाले. यामुळे त्यांना निधी मिळण्यात अडचण येत होती. आता वारसांना निधी दिला जाणार आहे. संबंधितांनी कागदपत्रांची पूर्तता १८ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणिकरण पूर्ण करून घ्यावे.
- नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT