Ethanol production Agrowon
ॲग्रो विशेष

Ethanol Production : सी हेवी मोलॅसिसपासून तयार इथेनॉलला प्रोत्साहान अनुदान

Ethanol Incentive subsidy : तेल उत्पादक कंपन्यांनी सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला प्रतिलिटर ६.८७ रुपये प्रोत्साहानात्मक अनुदान देण्‍याचा निर्णय घेतला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

राजकुमार चौगुले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
C heavy molasses Ethanol Production : कोल्हापूर ः तेल उत्पादक कंपन्यांनी सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला प्रतिलिटर ६.८७ रुपये प्रोत्साहानात्मक अनुदान देण्‍याचा निर्णय घेतला आहे. सध्या हा दर प्रतिलिटर ४९.४१ रुपयांवरून ५६.२८ रुपये प्रतिलिटर होईल. अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या निर्देशानुसार अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे साखर उद्योगात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

दरवाढीमुळे मोलॅसिसची निर्यात कमी होऊन इथेनॉलसाठी जास्तीत जास्त मोलॅसिस उपलब्‍ध होईल, असा अंदाज आहे. प्रोत्साहानात्मक अनुदान देण्याच्या निर्णयाचे आम्ही स्‍वागत करतो, असे इंडियन शुगर ॲन्ड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (इस्‍मा) ने म्हटले आहे. संघटनेचे अध्यक्ष एम. प्रभाकर राव यांनी याबाबतचे पत्रकही प्रसिद्घीस दिले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून साखर उद्योगाबाबत उलटसुलट निर्णय होत असताना प्रोत्साहानात्‍मक अनुदानामुळे कारखानदारांना दिलासा मिळाला आहे. १५ डिसेंबरला मंत्रालयाने तेल कंपन्यांना नवीन आवंटन जाहीर करण्याची सूचना केली होती. प्रत्‍येक प्रकल्पानुसार उसाचा रस, बी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलबाबत नव्याने मागणी नोंदविण्यास सांगितली होती. १७ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविण्‍यास परवानगीही दिली होती. यांतर तेल उत्पादक कंपन्यांनी कोणत्‍या घटकापासून किती इथेनॉल हवे आहे, याबाबतची मागणी जाहीर केली आहे. यात सी हेवी मोलॅसिसपासून खरेदी करण्यात येणाऱ्या इथेनॉलवर अनुदान देण्याची निर्णय कंपन्यांनी घेतला आहे.

इथेनॉल निर्मितीवर बंधने आणल्याने केंद्राच्या महत्त्वाकांक्षी इंधनामध्ये इथेनॉलच्या मिश्रण कार्यक्रमावर मर्यादा येतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. या पार्श्‍वभूमीवर सी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल तयार करण्याला प्रोत्साहन म्हणून हा निर्णय झाला. आता कारखान्यांनी मोलॅसिसची निर्यात न करता त्‍यापासून जास्तीत जास्त इथेनॉल तयार करावे, असे आवाहनही साखर उद्योगाने कारखानदारांना केले आहे.

तेल उत्पादक कंपन्यांनी आता बी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला ८.५० तर सिरपपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला ९.५० रुपये प्रतिलिटर दरवाढ द्यावी. जरी हे इथेनॉल नियंत्रित स्वरूपात बनणार असले तरी चांगला दर मिळाल्यास त्याचा फायदा कारखान्यांना होईल. कारखाने लवकरात लवकर शेतकऱ्यांची एफआरपी देऊ शकतील.
- पी. जी. मेढे, साखर तज्ज्ञ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT