Maratha Reservation Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : यवतमाळ जिल्ह्यात कुणबी नोंदी पाच लाखांवर

Kunbi Record : राज्यात मराठा-कुणबी आरक्षणावरून वातावरण तापले आहे. राज्य सरकारने मराठा-कुणबी जातीच्या नोंदी तपासण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात ५० लाख नोंदी तपासण्यात आल्या आहेत.

Team Agrowon

Yavatmal News : राज्यात मराठा-कुणबी आरक्षणावरून वातावरण तापले आहे. राज्य सरकारने मराठा-कुणबी जातीच्या नोंदी तपासण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात ५० लाख नोंदी तपासण्यात आल्या आहेत. यात कुणबी जातीच्या पाच लाखांवर नोंदी सापडल्या आहेत.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनाला सुरुवात केली होती. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी उपोषण झाले. यानंतर मनोज जरांगे पाटील यांना समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आहे.

जिल्ह्यातून त्यांना पाठिंबा मिळाला. याच मागणीसाठी आंदोलनानंतर राज्य सरकारने राज्यात मराठा-कुणबी जातीच्या नोंदी तपासण्याचे आश्‍वासन दिले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हास्तरावर मराठा-कुणबी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आले होते.

या ठिकाणी कुणबी-मराठा, मराठा-कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू होते. नोंदी शोधण्याचे काम जवळपास संपले आहे. गेल्या ३० ते ३५ दिवसांत जिल्ह्यात ५० लाखांपेक्षा जास्त नोंदी तपासण्यात आल्या आहेत. यासाठी शासनाने सर्व जिल्ह्यांमध्ये कर्मचारी वर्ग देऊन या नोंदी तपासण्यास सुरुवात केली होती.

जिल्ह्यात युद्धपातळीवर कक्षातर्फे काम करण्यात आले. जिल्ह्यात पाच लाखांवर कुणबी नोंदी सापडल्या आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यात मराठा-कुणबी तसेच कुणबी-मराठा असलेल्या नोंदी अद्यापपर्यंत सापडलेल्या नाहीत.

तहसील कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालयातील नोंदी, पेरेपत्रक, कूळ नोंदवही, हक्क नोंदपत्रक, कोतवाल बुकांची नक्कल, टिपण बुक, विविध योजनांचे बुकांचीही तपासणी करण्यात आली आहे.

नोंदी शोधण्यासाठी मोहीम

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी शोधण्यासाठी युद्धस्तरावर काम झाले. जिल्ह्यातील विविध विभागांशी समन्वय साधून आकडे गोळा करण्यात आले आहे. नोंदी शोधताना खरेदी-विक्री नोंदणी, कोतवाल बुकांची नक्कल याशिवाय इतर महसुली पुराव्यासोबत पोलिसांकडील अटक पंचनामे, क्राइम रजिस्टरमध्ये शोधमोहीम राबविण्यात आली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India-UK Trade Deal: भारत-इंग्लंड कराराचा शेतकऱ्यांना फायदा नाही

Agriculture Irrigation Scheme: धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम शासन गुंडाळणार

Turmeric Price: हळदीचे दर दबावात

Pomegranate Crop Loss: डाळिंब बागायतदारांवर कोसळले अस्मानी संकट

Maharashtra Rain: विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT