Tur Market Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Rate : विदर्भात तूर पोचली दहा हजार रुपयांवर

Tur Market : दरवाढीच्या अपेक्षेने आवक कमी

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Nagpur News : नागपूर ः विदर्भात सर्वदूर तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. यवतमाळ बाजार समितीत तुरीला क्विंटलला ९२०० ते १००५० रुपयांचा दर मिळत आहे. नऊ जानेवारी रोजी याच बाजारात तुरीचे दर ७४०५ ते ८४५५ रुपयांवर होते. त्यानंतर टप्याटप्याने तुरीच्या दरात तेजी अनुभवली जात आहे, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

मॉन्सूनोत्तर त्यानंतर अवकाळी पाऊस, गारपीट या कारणांमुळे तुरीची उत्पादकता घटली आहे. परिणामी बाजारात तुरीची आवक कमी असल्याने त्याचा दरावर परिणाम झाला आहे. प्रक्रियेकामी तुरीची वाढती मागणी आणि तुलनेत आवक कमी आहे. त्यामुळे उद्योजकांकडून वाढीव दरात खरेदी होत आहे. त्यामुळेच अवघ्या महिनाभरात दर क्‍विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांनी तेजीत आहेत. १५ जानेवारीच्या दरम्यान यवतमाळ बाजार समितीत तुरीचे दर ७८०० ते ९२८५ रुपयांवर होते. ९३५५, ९४९५ आणि त्यानंतर २ फेब्रुवारीला थेट दर १०१४५ रुपयांवर पोचले. १०४०० असा दरही तुरीला मिळाला.

कारंजा (वाशीम) बाजार समितीत तुरीला ८६०० तर कमाल १००१५ रुपये दर मिळत आहे. तुरीचा सरासरी दर ९४०० रुपये आहे, असे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. कारंजा बाजारात तुरीची आवक २५०० क्‍विंटल इतकी आहे. वाशीम जिल्ह्यात सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक घेण्याचा पॅटर्न आहे. सलग तुरीची लागवड या भागात होत नाही. अकोला बाजार समितीमधील तुरीची आवक ८४८ क्‍विंटल तर दर ९५०० ते १०१४० असा होता. शेतकऱ्यांना तुरीच्या दरात आणखी तेजीची अपेक्षा असल्याने त्यांच्याकडून बाजारात कमी माल आणला जात आहे. शेगाव बाजार समितीत तूर ९००० ते ९६०० रुपयांवर स्थिर असून २० क्‍विंटल इतकी अत्यल्प आवक नोंदविली गेली.

अमरावतीत दर कमी
अमरावती बाजार समितीत तुरीची आवक ११४६१ क्‍विंटल इतकी आहे. मात्र विदर्भातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत या ठिकाणी ९२०० ते ९९०१ असा दर मिळत होता. त्याचवेळी कळमना (नागपूर) बाजार समितीत तुरीची ४६१८ तर दर ९२०० ते १०४११ असे होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT