Tur Rate : तुरीची उत्पादकता हेक्टरी सहा क्विंटल

जिल्ह्यात यावर्षी १ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रात तूर होती. गतवर्षीच्या तुलनेत ती १५ हजार हेक्टरने कमी व वर्ष २०२०-२१ च्या तुलनेत नऊ हजार हेक्टरने अधिक आहे.
Tur Rate
Tur Rate Agrowon

tur Market Update Amravati : खरीप हंगामातील कपाशी (Cotton), सोयाबीनची (Soybean Productivity) उत्पादकता प्रभावित झाली होती. संततधार पावसाचा फटका आता तुरीलाही बसल्याचे सिद्ध झाले आहे. तुरीच्या (Tur Productivity) उत्पादकतेची सरासरी यंदा गतवर्षीच्या तुलनेत निम्मी राहण्याचा अंदाज आहे.

पीक कापणी प्रयोगातून आलेल्या प्राथमिक अंदाजानुसार ही सरासरी हेक्टरी सहा ते सात क्विंटल इतकी राहील.

यंदा खरीप हंगामात अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेतकऱ्यांसाठी नगदी पीक ठरणारे कपाशी आणि सोयाबीनची उत्पादकता कमी झाली. या दोन्ही पिकांना सध्या दर कमी असल्याने शेतकऱ्यांनी या शेतीमालाची विक्री थांबवली आहे.

खरिपातील पावसाचा कपाशी, सोयाबीनसोबतच तुरीलाही फटका बसला. हंगामाच्या प्रारंभी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ४९ हजार हेक्टर व संततधार पावसामुळे २९ हजार हेक्टर क्षेत्रातील तूर बाधित झाली आहे.

एकूण ७८ हजार हेक्टर क्षेत्रातील तूर उत्पादकांना नुकसान भरपाईचा संयुक्त प्रस्ताव कृषी विभागाने शासनाला पाठविला आहे. यातील अतिवृष्टीची मदत मिळाली आहे.

Tur Rate
Tur Market : तूर यंदा ९ हजारांचा टप्पा गाठेल का?

जिल्ह्यात यावर्षी १ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रात तूर होती. गतवर्षीच्या तुलनेत ती १५ हजार हेक्टरने कमी व वर्ष २०२०-२१ च्या तुलनेत नऊ हजार हेक्टरने अधिक आहे. यातील ७८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने उर्वरित क्षेत्रात उत्पादनाच्या सरासरीचा अंदाज काढण्यात येत आहे.

वर्ष २०२०-२१ च्या हंगामात हेक्टरी ९४२ किलो, तर वर्ष २०२१-२२ च्या हंगामात १२१४ किलो राहिली. यावर्षीच्या हंगामात अतिवृष्टी व संततधार पावसासोबतच परिपक्वतेच्या कालावधीत पडलेला दव याचा उत्पादकतेवर परिणाम झाला आहे.

सध्या पीक कापणी प्रयोग सुरू आहेत. काही महसूल मंडलांत उत्पादकता अत्यंत अल्प प्रमाणात आली असल्याचे सांगण्यात आले. सर्व प्रयोग आटोपल्यानंतर अंतिम सरासरी काढण्यात येणार आहे.

तथापि आतापर्यंत आलेल्या अंदाजानुसार यावर्षी तुरीची उत्पादकता हेक्टरी सहा ते सात क्विंटल राहण्याची शक्यता आहे.

याचाच अर्थ एकरी तीन क्विंटलचीही सरासरी शेतकऱ्यांच्या हाती लागणार नाही.दरम्यान, खुल्या बाजारात तुरीचे दर हमीदराच्या तुलनेत बऱ्यापैकी वाढू लागले आहेत. स्थानिक बाजार समितीत तुरीला ७३५० ते ८१५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

Tur Rate
Rabi Crop Harvesting : पाच जिल्ह्यांत तूर काढणी पुर्ण, तर कापसाची वेचणीही आटोपली
सध्या तुरीचे पीक कापणी प्रयोग सुरू आहेत. काही मंडलांत सरासरी अल्प आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार सहा ते सात क्विंटल हेक्टरी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. अंतिम सरासरीनंतर निश्‍चित उत्पादकता समोर येईल.
अनिल खर्चान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com