Pune Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Rain : पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला

Pune Dam : गेले आठ ते दहा दिवस धरणक्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात पावसाचा जोर होता. त्यामुळे धरणांत पाण्याची आवक सुरू झाल्याने धरणांतील पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होती. परंतु मागील दोन ते तीन दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune Dam Storage : पुणे : गेले आठ ते दहा दिवस धरणक्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात पावसाचा जोर होता. त्यामुळे धरणांत पाण्याची आवक सुरू झाल्याने धरणांतील पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होती. परंतु मागील दोन ते तीन दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. सध्या टेमघर, गुंजवणी व मुळशी या धरणक्षेत्रात आणि घाटमाथ्यावर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत.

मागील काही दिवसांत धरणांत तब्बल २९.९२ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. तर बुधवारी धरणक्षेत्रात कमी-अधिक पाऊस झाल्यामुळे गुरुवारी (ता.११) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांत
१.३९ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. यामध्ये मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, खडकवासला या धरणांत नव्याने ०.१९ टीएमसी एवढी आवक झाली आहे. नीरा खोऱ्यातील धरणांत नव्याने ०.४१ टीएमसी, तर कुकडी खोऱ्यातील धरणांत नव्याने ०.११ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. याशिवाय उजनी, मुळशी या धरणांतही पाण्याची आवक झाली आहे.

गेल्या आठवडाभर ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा, मुळशी आणि कुंडली अशा घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडला. आता या भागात पावसाचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत मुळशीच्या घाटमाथ्यावर १४ मिलिमीटर, तर लोणावळा, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, कुंडली या घाटमाथ्यावर तुरळक सरी बरसल्या. उजनीच्या धरणक्षेत्रातही मागील काही दिवस पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. परंतु नीरा आणि भीमा खोऱ्यात होत असलेल्या पावसामुळे उजनीत नव्याने ०.६२ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

मुठा खोऱ्यातील टेमघर धरणक्षेत्रात १०मिलिमीटर पाऊस पडला असून वरसगाव, पानशेत, खडकवासला धरणक्षेत्रात हलक्या सरी पडल्या. नीरा खोऱ्यातील गुंजवणी धरणक्षेत्रात ११ मिलिमीटर पाऊस पडला. तर पवना, कळमोडी, भाटघर, नीरा देवघर धरणक्षेत्रात तुरळक पाऊस झाला. तर कासारसाई, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, नाझरे, वडिवळे, वीर यासह कुकडी खोऱ्यातील सर्वच धरणक्षेत्रात पावसाची उघडीप होती. तर काही वेळा ढगाळ वातावरणाची स्थिती कायम होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT