Sangli Rice Sowing Update : शिराळा तालुका हा भात उत्पादनासाठी अग्रेसर आहे. सध्या शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील मणदूर, सोनवडे, आरळा, करुंगली, मराठेवाडी, काळुंद्रे परिसरात धूळवाफेवर भात पेरणीला सुरुवात झाली. गाव व वाडी-वस्तीवरील पेरणीपूर्व मशागत आटोपून शेतकरी भात पेरणीच्या कामात गुंतले आहेत.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात मॉन्सूनचे आगमन लवकर होते. प्रतिवर्षीप्रमाणे २५ मे रोजी रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर शेतकरी भातपेरणी करत होते. यंदा २२ मेपासूनच मणदूर, सोनवडे, आरळा, करुंगली, काळुंद्रे परिसरातील शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरणीला सुरुवात केली आहे.
टोकण, कुरी, तसेच बांडग्याच्या साह्याने भात पेरणी केली जात आहे. यांत्रिकीकरणाच्या युगात शेतकऱ्यांनाही आता मजुरांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे शेतकरी पैरा पद्धतीने शेती करत आहे.
पेरणीमध्ये रत्नागिरी २४, बासमती, आर २४ कोल्हापुरी, सोना, घनसाळ, शिराळी जाडा, हळवा, दोडका, वांडरा यांसह विविध प्रकारचे बियाणे उपलब्ध करून धूळवाफेवर भात पेरणी केली जात आहे. या परिसरात कोमल वाणाच्या बियाण्याला अधिक मागणी आहे.
एकंदरीत, परिसर शेतकऱ्यांनी फुलून गेला आहे. महिला, पुरुष व लहान मुलांसमवेत शेतकरी रणरणत्या उन्हात भात पेरणी करतानाचे चित्र आहे. या हंगामामध्ये मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. शेतकरी पैरा पद्धतीने भात पेरणीची कामे करीत आहेत.
‘कोमल’ वाणाला पसंती
तालुक्यात रत्नागिरी २४, बासमती, आर २४ कोल्हापुरी, सोना, घनसाळ, शिराळीजाडा, हळवा यांसह राशी अक्षता, पूनम गोल्ड, कावेरी, रोशनी, दोडका, वांडरासह विविध प्रकारची बियाणे उपलब्ध असून, कोमल वाणाच्या बियाण्याला अधिक मागणी आहे. त्यामुळे शेतकरी या वाणांना अधिक पसंती देत असल्याचे चित्र आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.