Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : सांगली जिल्ह्यात खरिपात १६८० कोटींचे पीककर्ज वितरण

Kharif Season : जिल्ह्यात खरीप हंगामात १६८० कोटी ४१ लाख म्हणजे ९० टक्के कर्ज वितरण करण्यात आले आहे. गतवर्षी १७०८ कोटी १५ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले होते.

Team Agrowon

Sangali News : सांगली ः जिल्ह्यात खरीप हंगामात १६८० कोटी ४१ लाख म्हणजे ९० टक्के कर्ज वितरण करण्यात आले आहे. गतवर्षी १७०८ कोटी १५ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात चार टक्क्यांनी कर्ज वितरणात घट झाली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामातील कर्ज वितरणचा अंतिम अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने तयार केला आहे.

यंदाच्या खरीप हंगामात जिल्हा बॅंक, राष्ट्रीयकृत, व्यापारी, खासगी आणि ग्रामीण बॅंकांना पीक कर्ज वितरणाचे १८६५ कोटी १८ लाखाचे उद्दिष्ट होते. त्यानुसार खरीप हंगामात जिल्हा बॅंक, राष्ट्रीयकृत, व्यापारी, खासगी आणि ग्रामीण बॅंकांनी १ लाख ६३ हजार ८२९ शेतकऱ्यांना १६८० कोटी ४१ लाख म्हणजे ९० टक्के कर्ज वितरण करण्यात आले आहे.

गतवर्षी म्हणजे २०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्हा बॅंक, राष्ट्रीयीकृत, व्यापारी, खासगी आणि ग्रामीण बॅंकांना १ लाख ६५ हजार ३६४ शेतकऱ्यांना १८१८ कोटी ६४ लाख कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले होते. १ लाख ६५ हजार ३६४ शेतकऱ्यांना १७०८ कोटी १५ लाख म्हणजे ९३.९२ टक्के कर्ज वितरण केले होते. २०२४-२५ या आर्थिक वर्षात कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट गतवर्षीच्या तुलनेत वाढले होते. वास्तविक पाहता, जिल्हा बॅंकेकडून दर वर्षी खरीप हंगामात कर्ज वितरण करण्यात आघाडीवर असते. गतवर्षीही जिल्हा बॅंक कर्ज वाटप करण्यात आघाडी घेतली.


यावर्षीही जिल्हा बॅंकेकडून शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी आघाडीवर आहे. राष्ट्रीयकृत, व्यापारी, खासगी आणि ग्रामीण बॅंकांही शेतकऱ्यांना खरिपातील पिकांना कर्ज देतात. मात्र, राष्ट्रीय, व्यापारी बॅंका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नेहमीच आखडता हात असतो. यंदाही या बॅंकांनी कर्ज वाटप करण्यास नेहमीप्रमाणे मागेच राहिल्या आहेत. गतवर्षी १७०८ कोटी १५ लाख म्हणजे ९३.९२ टक्के कर्ज वितरण केले. तर यंदा १६८० कोटी ४१ लाख म्हणजे ९३.१३ टक्के कर्ज वाटप केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरिपात ३.८३ टक्क्यांनी कर्ज वितरणात घट झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Vidhansabha Election : अहिल्यानगर जिल्ह्यात बंडखोरीने पक्षीय उमेदवारांचे वाढवले ‘टेन्शन’

Cotton Market : दर्यापूर बाजार समिती यार्डवर होणार कापूस लिलाव

Paddy MSP : भातपिकाला हमीभावाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Livestock Census Survey : जळगावात पशुगणना सर्व्हेक्षण सुरू

Karnataka Sugar Factories : कर्नाटक सीमाभागातील साखर कारखाने सुरू; कोल्हापूर विभागातील उसाची होणार पळवापळवी

SCROLL FOR NEXT