Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : नांदगाव तालुक्यात जूनमध्येच सुरू झालेले टँकर कायम

Water Crisis : तालुक्यात एकूण ८५ गावे आहेत, त्याच्या निम्म्याहून अधिक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतोय.

Team Agrowon

Nashik News : नांदगाव तालुक्याच्या भाळी दुष्काळ तसा कायमचाच. तालुक्यात गेल्या वर्षी ९ जूनला नवसारी, बोयगाव, शास्त्रीनगर या तीन गावांना टँकर सुरू झाले. त्यानंतर लगेचच खादगाव, धोटाणे खुर्दला दहा दिवसांत टँकर सुरू करावे लागले, तेव्हापासून टॅंकर सुरू झालेल्या तालुक्यातील गावांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत गेली. तालुक्यात एकूण ८५ गावे आहेत, त्याच्या निम्म्याहून अधिक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतोय.

जून ते जून असा वर्षभर सर्वाधिक संख्येने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असलेला नांदगाव तालुका हा जिल्ह्यातील एकमेव तालुका आहे. पाऊस नाही, विहिरी आटल्या, धरणे कोरडीठाक पडलेली अशी अवस्था तशी नेहमी अधूनमधून उद्भवत असते. गेल्या आठवड्यात वळिवाचा पाऊस आला अन टँकरवरची भिस्त कमी होईल असे वाटू लागले असले तरी नव्याने पुन्हा दहा गावांच्या टँकरच्या प्रस्ताव पाठवावा लागला.

यावरून तालुक्यात उदभवलेल्या पाण्याचे दुर्भिक्ष् किती गंभीर स्वरूपाचे आहे हे लक्षात यावे. एकीकडे दुष्काळाचे संकट गहिरे होत असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठीची पायपीट थांबण्याचे नाव घेत नाही. तालुक्यातील नळयोजनाची स्थिती नाजूक असल्यामुळे सगळी भिस्त आता टँकरवर विसंबून आहे.

ग्रामीण भागातील महिला पिण्याच्या पाण्यासाठी आजूबाजूच्या विहिरी शोधण्यासाठी पायपीट करतात, त्यांचा तो नित्यक्रम बनलाय. कारण टँकरचे पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही. एक ते दीड किलोमीटरवरच्या विहिरीवर जाऊन पाणी लांबून पाणी भरायला यावं लागते. दिवसभर घरातली कामे करायची, मजुरीला जायचे, घरी थांबले कि पाण्याचे टँकर आले कि धावपळ उडते.

ज्या विहिरीत टँकरचे पाणी टाकले जाते तेथून ते पाणी पुन्हा शेंदताना दम लागतो. हातापायाला गोळे येतात, ओझं वाहून आणल्याने मान दुखते. सगळे अंग दुखते, अशा बहुतांशी तक्रारी ग्रामीण महिलांच्या बोलण्यातून पुढे आल्या.  तालुक्यात होणारा टँकरचा पाणीपुरवठा नियमित होत असला तरी तो पुरेसा नाही. ओरड कायम आहे. शिवाय सुरू असणाऱ्या टँकरमधून होणारी गळती ही एक वेगळी डोकेदुखी आहे .

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

Water Management: आधुनिक तंत्रज्ञानाने जल व्यवस्थापनातील समस्येची उकल शक्य

El Nino Impact Agriculture: यंदा एल निनोचे सावट; भूजल पुर्भरण गरजेचे!

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

SCROLL FOR NEXT