Banana Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Cultivation : खानदेशात पावसाने मृग बहर केळी लागवड रखडली

Farmer Issue : खानदेशात सततच्या पावसाने मृग बहरातील केळी लागवड रखडली आहे. पावसाने वाफसा नाहीसा झाला आहे. यामुळे लागवड करणे शक्य होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात सततच्या पावसाने मृग बहरातील केळी लागवड रखडली आहे. पावसाने वाफसा नाहीसा झाला आहे. यामुळे लागवड करणे शक्य होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जूनमध्ये अनेक भागांत केळी लागवड झाली. जून, जुलैत मृग बहर केळीची लागवड खानदेशात केली जाते. जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, पाचोरा-भडगाव, जामनेर, जळगाव, धुळ्यातील शिरपूर या भागात मृगबहर केळीची लागवड अधिक असते. रावेर, यावल भागांत अनेक शेतकरी लागवड करतात.

या केळी लागवडीसाठी कमाल शेतकरी केळीचे कंद व काही शेतकरी उतिसंवर्धित रोपे उपयोगात आणतात. दर्जेदार केळीचे वाण किंवा कंद लागवडीवर शेतकऱ्यांचा भर असतो. त्यासाठी आंबेमोहोर, श्रीमंती, महालक्ष्मी, सातमासी व ग्रॅण्ड नैन या वाणांच्या कंदांना शेतकरी पसंती देतात. केळी कंद औरंगाबादमधील कन्नड, सोयगाव, जळगावमधील जामनेर, रावेर, यावल, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, अक्कलकुवा या भागात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.

हलक्या, मध्यम जमिनीत काळ्या कसदार क्षेत्रातील कंद लागवडीला शेतकरी पसंती देतात. तर काळ्या कसदार जमिनीत हलक्या, मध्यम जमिनीत कंद लागवडीला पसंती दिली जाते. परंतु गेले आठ ते १० दिवस खानदेशात सतत पाऊस सुरू आहे त्यामुळे वाफसा होत नाही. अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागांमध्ये पाणी साचल्याने वाफसा नाहीसा झाला आहे.

यामुळे केळी बागांमधून कंद काढणे, त्यांची लागवड, वाहतूक यावर परिणाम झाला आहे. तसेच वाफसा नसल्याने लागवड करता येत नाही. सुमारे १० ते १५ हजार हेक्टवर नियोजित केळी लागवडदेखील रखडली आहे. केळीची सुमारे ५५ ते ६० हजार हेक्टरवर लागवड होईल, अशी अपेक्षा आहे. काही भागांत पाणी कमी आहे. तर तापी, अनेरकाठी जलसाठे मुबलक आहेत. यामुळे केळी लागवड घटणार नाही, अशी स्थिती आहे. पुढे कोरडे वातावरण राहील्यास केळी लागवडीला पुढील काही दिवसांत वेग येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Marriage Problems: ग्रामीण भागातील लैंगिक कोंडमारा

Interview with IAS Varsha Ladda Untwal: मनुष्यबळाचा प्रश्‍न सोडविण्याला पहिले प्राधान्य

Agriculture Loan Waiver: शेतकऱ्यांची राजकीय ताकद उभी राहील का?

Wildlife Crop Damage Compensation: वन्यप्राण्यांमुळे पीक नुकसानीची भरपाई कशी मिळते?

Weekly Weather: हलक्या, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT