Animal Husbandry Agrowon
ॲग्रो विशेष

Livestock Issue : खानदेशात पावसाने पशुधन बेजार

Khandesh Rain : खानदेशात सततच्या पावसाने पिकांसह पशुधनावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. सातपुडा पर्वतासह अन्य भागांत पशुधनात विविध आजारांची समस्या दिसत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात सततच्या पावसाने पिकांसह पशुधनावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. सातपुडा पर्वतासह अन्य भागांत पशुधनात विविध आजारांची समस्या दिसत आहे. यात शासकीय यंत्रणा अपुऱ्या पडत असून, वेळीच या समस्येबाबत कार्यवाही करून आजार नियंत्रणात आणण्याची मागणी केली जात आहे.

खानदेशात सलग ३४ दिवस पाऊस सुरू आहे. अनेक भागांत एकही दिवस पावसाचा खंड मागील ३४ ते ३५ दिवसांत राहिलेला नाही. यामुळे पिके पाण्यात गेली असून, पिकांत किडींची व अन्य समस्या तयार झाली आहे. ती दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना फवारण्या व अन्य असा मोठा खर्च करावा लागत आहे. ग्रामीण भागात जलजन्य व अन्य आजारांचे रुग्णही वाढले आहेत. अशीच स्थिती पशुधनातही आहे.

पशुधनही सततच्या पावसाने बेजार झाले आहे. दुधाळ पशुधनाच्या दूध उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे. ताप, हगवण अशा समस्या पशुधनात दिसत आहेत. लम्पी स्कीन व अन्य गंभीर आजारांच्या तक्रारी अद्याप आलेल्या नाहीत. परंतु काही भागांत लाळ्या खुरकूत आजाराच्या तक्रारी आहेत. प्रत्येक गावात पशुधन आजारी आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश नसल्याने पशुधनाच्या प्रतिकारक्षमतेलाही बाधा पोहोचली आहे.

यातच अनेक दिवस पावसामुळे भाकड पशुधनही घरीच होते. पावसामुळे चराईसाठी अनेकांनी पशुधन नदीकाठी किंवा माळरानात नेणे टाळले. एकाच ठिकाणी राहून पशुधनाच्या प्रतिकार शक्तीला धक्का बसला आहे. अनेक शेतकऱ्यांकडे पक्के गोठे किंवा बंदिस्त गोठे नाहीत. उघड्यावरच पशुधनाचा निवारा रात्रंदिवस असतो. या पशुधनाला पावसाचा मोठा फटका बसला आहे.

सातपुडा पर्वतात पक्के गोठे व बंदीस्त गोठ्यांची संख्या अल्प आहे. उघड्यावरच या भागातील पशुधन असते. या पशुधनाचे मोठे नुकसान होत आहे. नंदुरबारातील अक्कलकुवा, धडगाव, शहादा, तळोदा, जळगावातील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर भागातील सातपुडालगत व पर्वतीय क्षेत्रातील पशुधनात आजाराची समस्या अधिक असल्याची माहिती मिळाली.

पशुवैद्यकीय दवाखाने अल्प

खानदेशात पशुवैद्यकीय यंत्रणा वाढलेलीच नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रांपेक्षा अधिकची बिकट अवस्था पशुवैद्यकीय दवाखान्यांची आहे. अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारती गळक्या, नादुरूस्त आहेत. त्यात अधिकारी आपले कामकाज करू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. यात एकाच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर चार ते पाच दवाखान्यांचा किंवा १५ ते २० गावांचा कार्यभार आहे. पशुधन पर्यवेक्षक गावोगावी सर्वेक्षण करीत नाहीत. यामुळेही पशुधनात आजार पसरत असल्याच्या तक्रारी आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chandrapur Water Crisis: वाढत्या उष्णतेने चंद्रपूर होरपळले, जलसाठा ४५ टक्क्यांवर

Nanaji Deshmukh Project: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात ग्रामस्तरावरच अर्ज रखडले

Fertilizer Dealer Action: खत लिंकिंग केल्यास संबंधित विक्रेत्यावर होणार कठोर कारवाई: कृषी अधिकारी विवेक कुंभार

Banana Crop Damage: वादळामुळे केळीचे पीक जमीनदोस्त

Soybean Seeds Availability: खरिपासाठी घरगुती सोयाबीन बियाण्याचा मोठा साठा उपलब्ध

SCROLL FOR NEXT