Drip Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Drip Irrigation Subsidy : जळगावात ठिबक संचाचे अनुदान वितरण रखडले

Drip Irrigation in Jalgaon : जिल्ह्यात सूक्ष्मसिंचन अनुदान मागील महिन्यात वितरणास सुरुवात झाली. परंतु अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत.

Team Agrowon

Jalgaon News: जिल्ह्यात सूक्ष्मसिंचन अनुदान मागील महिन्यात वितरणास सुरुवात झाली. परंतु अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. काही तालुक्यांतच अधिकचा निधी दिला जात असल्याची तक्रार आहे. जळगाव, चोपडा, यावल, रावेर, जामनेर भागांतही अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली जात आहे.

शासनाने मागील महिन्यातच ठिबकबाबत अनुदान मंजूर केले होते. त्यातून जिल्ह्यासाठी सुमारे २५ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. हे अनुदान प्राप्त झाल्यानंतर त्याचे अनेक दिवस वितरणच झाले नाही.

परंतु मागील महिन्याच्या अखेरच्या १२ ते १५ दिवसांत काही भागात अनुदान देण्यात आले. मागील आठवड्यात पारोळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अनुदान डीबीटी पद्धतीने देण्यात आले. परंतु अनेक भागांत शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

मागील फेब्रुवारी व मार्चमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या क्षेत्रात जिओ टॅगिंग झाले व त्यांचे प्रस्ताव मार्गी लागले, त्या शेतकऱ्यांनाही अनुदान तातडीने देण्याची मागणी केली जात आहे. जिल्ह्यात सुमारे पाच हजारांवर शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी करून ठिबकवर खर्च केला. त्यासाठी अनुदान मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु हे अनुदान प्राप्तच झालेले नाही. शासन ज्या योजनांबाबत मागणी नव्हती, त्या योजना आणत आहे व त्यावर खर्च करीत आहे. परंतु शेतकऱ्यांना ठिबकच्या अनुदानासाठी वर्षभर किंवा यापेक्षा अधिक कालावधीपासून प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष तयार झाला आहे.

सूक्ष्मसिंचन योजनेत ठिबक संच अधिकचे घेण्यात आले आहेत. तसेच तुषार संचही अनेकांनी घेतले आहेत. काही ठिबक वितरकांनी विश्वासावर उधारीने शेतकऱ्यांना अनुदान येईल, यासाठी ठिबक दिले आहे.

परंतु अनुदान आलेले नसल्याने अनेक ठिबक वितरक अडचणीत आले आहेत. अनुदान वितरण गतीने व तातडीने केले जावे. कृषी विभागाने त्याबाबत तत्परतेने काम करावे, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

Kesar Mango Cultivation : मराठवाडा, विदर्भातील केसर आंबा उत्पादनातील संधीची मांडणी

Horticulture Development : आंबा पुनरुज्जीवनासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT