Mango Production Decrease Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Production : इगतपुरीत आंबा, जांभूळ उत्पादन घटणार

गावठी रानमेवा आणि आदिवासींचे वेगळे असे आर्थिक नाते आहे. रानमेवामुळे आदिवासी व डोंगरदऱ्यात वास्तव्य करणाऱ्यांना आर्थिक हातभार मिळत असतो.

Team Agrowon

Nashik News : निसर्गाचा लहरीपणा,अवकाळी पावसाचा शिडकावा, गारांचा मारा, वातावरणातील असमतोलपणा आणि त्यातच सततच्या ढगाळ वातावरणामुळे झाडांचे बिघडलेले आरोग्य व गेल्या महिनाभरापासून वाढलेल्या उष्णतेमुळे यंदा ऐन उन्हाळ्यात येणाऱ्या गावरान रानमेव्याला ‘बुरे दिन’ आले आहेत.

सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे व ढगाळ वातावरणामुळे आंबा, जांभूळ व करवंदासह आवळ्याच्या कोवळ्या फळांना फटका बसल्यामुळे रानमेव्याच्या उत्पन्नात घटीची शक्यता व्यक्त होत आहे. तीन-चार वर्षांपासून रानमेव्याला फटका बसत आहे.

इगरपुरीत, कसारा घाटाच्या विस्तीर्ण जंगलामुळे शेंद्रया, दौडी साखऱ्या, भोपळ्या, कलम्या व गावरान आंब्याच्या जातीसह जांभूळ, करवंद व गावठी आवळ्याची झाडे आहेत. मात्र नैसर्गिक असमतोलामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

आदिवासी मुकणार हक्काच्या कमाईला

गावठी रानमेवा आणि आदिवासींचे वेगळे असे आर्थिक नाते आहे. रानमेवामुळे आदिवासी व डोंगरदऱ्यात वास्तव्य करणाऱ्यांना आर्थिक हातभार मिळत असतो.

उन्हाळ्यात येणाऱ्या रानमेव्याच्या (गावरान आंबा, करवंद, जांभुळ, शेंद्रया, गावठी आवळा) विक्रीतून प्रपंच भागवून येणाऱ्या हंगामाच्या तयारीसाठी हेच दोन पैसे आवरून ठेवत नियोजन केले जाते. मात्र यंदा उत्पन्नच घटणार असल्यामुळे आर्थिक चणचणीचा सामना करावा लागणार आहे.

यंदाच्या हंगामात येथील जंगलात करवंद, जांभळाच्या झाडांना व गावरान आंब्यांना चांगला मोहोर आणि बहार आला आहे. मात्र ऐन फळ वाढीच्या काळात वेळोवेळी पडणारा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व उष्णतेचा तडाखा बसत असल्यामुळे बहार झटकला जात आहे. त्यामुळे यंदा दोन पैसे कमीच मिळतील याची शक्यता आहे.
फशाबाई खडके/साखरीबाई तेलम, आदिवासी महिला, चिंचलेखैरे (ता.इगतपुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing: कपाशीची ८ हजार ६७१ हेक्टर लागवड उगवण संकटात

Kharif Sowing Issues: पुसद तालुक्यात ७० हजार हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

Vidarbha Water Crisis: विदर्भावर जलसंकटाचे सावट

Ahilyanagar Politics: पंचवीस टक्के ताकद वापरली तरी आमदार पाडू शकतो

Sugarcane Price: विलास साखर कारखान्याकडून उसाला ३,१७१ रुपये दर

SCROLL FOR NEXT