E Peek Pahani Agrowon
ॲग्रो विशेष

E Peek Pahani : हत्तूरमध्ये होईना ई-पीक पाहणी नोंदणी

Team Agrowon

Solapur News : आता तलाठ्याऐवजी ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची नोंद केली जात आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीनंतर सरकारी मदतीसाठी ॲपवर पीक नोंदणी बंधनकारक आहे. मात्र, हत्तुर (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकरी नोंदणीसाठी शेतात गेल्यावर ॲप आपण शेतापासून दूर असल्याचे सांगत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

दोन दिवस उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा गुरुवारी हजेरी लावली आहे. खरिपातील पिकांची काढणी, रास यासाठी धावपळ सुरू आहे. त्यात गावागावात ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणीसाठीही त्यांची धडपड सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांना याबद्दल पुरेशी माहिती नसली तरी कोणाला तरी गळ घालून ॲपवर नोंदणीसाठी प्रयत्न करीत आहेत.

कारण यंदा सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. खरिपातील पिकांचे नुकसान झाल्यास दिलासा मिळेल, या भरवशाने आधीच शेतकऱ्यांनी पीकविमा अर्ज भरून पिके विमा संरक्षित केली आहेत.

मात्र, त्यासाठी पीक पाहणी नोंदणीही बंधनकारक आहे. नोंदणी न केल्यास त्यांना विम्यासह सरकारी मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. हत्तुर येथे शेतात गेल्यावर ॲप आपण शेतापासून दूर असल्याचे सांगत आहे. विशेषतः ते त्यांच्या शेतापासून अडीच-तीन हजार मीटर दूर असल्याचे दाखवू लागल्याने शेतकरी चक्रावून गेले आहेत.

हत्तुर येथील शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणीबाबत तक्रारी केल्या आहेत. तलाठी, मंडल अधिकाऱ्यांकडून तसे आम्हाला कळविण्यात आले आहे. अन्य गावांतून अशा तक्रारी नाहीत. तक्रारीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधितांना कळविले आहे. तातडीने तांत्रिक दोष दूर करण्याचे प्रयत्न केले जातील.
जितेंद्र मोरे, अपर तहसीलदार, मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT