Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Rain Update: मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात पावसात जोर नाहीच

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar Rain News : मान्सून ने आपली व्याप्ती सर्वदूर वाढवली असल्याचा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील अनेक भागात अजूनही पावसाची हजेरी तुरळक, हलकीच आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाचही जिल्ह्यात रविवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासात काही मंडळ वगळता अनेक मंडळात हलकी मध्यम दमदार हजेरी लावणारा पाऊस आता सक्रिय होतो असे वाटत होते.

परंतु, सोमवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाची हजेरी एक-दोन ठिकाणचा अपवाद वगळता तुरळक, हलकीच राहिली. सोमवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३५ मंडळात तुरळक हलका पाऊस झाला.

जालना जिल्ह्यातील १४ मंडळातही पावसाची हजेरी तुरळक राहिली. बीड जिल्ह्यातील ५०, लातूर मधील २८ व धाराशिव जिल्ह्यातील ४२ मंडळातही पावसाची हजेरी बहुअंशी तुरळक व काही ठिकाणी हलक्या स्वरूपाची राहिली.

त्यामुळे ज्या ठिकाणी मध्यम ते थोडा दमदार पाऊस झाला. त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची गती वाढवली आहे. परंतु तुरळक, हलका पाऊस झालेल्या भागात मात्र अजूनही शेतकऱ्यांनी पेरणीला पसंती दिली नसल्याचे चित्र आहे. अशा भागात अजूनही शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

सोमवारी दुपारी एक ते तीन वाजेदरम्यान जालना जिल्ह्यातील धारकल्याण ते जालना व जालना ते बदनापूर दरम्यान अनेक भागात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी त्यापेक्षा थोडा जास्त पाऊस झाला. अंबड शहर परिसरातही दुपारी दोनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली होती.

घनसावंगी परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण व दुपारी तीनच्या सुमारास मध्यम पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील निलंगा परिसरात अधून मधून पावसाच्या सरी पडत होत्या.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील चापानेर परिसरात सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास अर्धा तास रिमझिम पाऊस पडत होता. बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर परिसरात सकाळपासून पावसाची उघडझाप करीत भुरभुर सुरू होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT