Farmer Waiting For Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा जोर कमीच

Maharashtra Rain Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ८४ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील २३ मंडलांत २० ते ५८ मिलिमीटर पाऊस झाला.

Team Agrowon

Chhatrapati Sambhaji Nagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव व लातूर या पाच जिल्ह्यांतील २६५ मंडलांमध्ये बुधवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने हजेरी लावली. बहुतांश मंडलांत पावसाचा जोर कमीच राहिला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकमेव पाचोड मंडलात ७३ मिलिमीटर पाऊस झाला. इतर मंडलांमध्ये तुरळक, हलका पाऊस झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ८४ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील २३ मंडलांत २० ते ५८ मिलिमीटर पाऊस झाला. पैठण तालुक्यातील पाचोड मंडलात अतिवृष्टी झाली. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात सरासरी २६.२ मिलिमीटर, पैठणमध्ये सरासरी २८.९, गंगापूरमध्ये सरासरी २०.७ मिलिमीटर पाऊस झाला.

जालना जिल्ह्यातील ४९ मंडलांत हलका, मध्यम तर काही मंडलांत दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील ११ मंडलांत २० ते ४८ मिलिमीटर पाऊस झाला. जाफराबाद तालुक्यात सरासरी ३१.३ मिलिमीटर, परतुरमध्ये सरासरी २२.८ मिलिमीटर पाऊस झाला.

बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ४७ मंडलांत पाऊस झाला. बहुतांश मंडलांत हलका पाऊस झाला. ७ मंडलांत २० ते ३१.५ मिलिमीटर पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील ६० पैकी ५० मंडलांत पाऊस झाला. रेणापूर तालुक्याकडे पावसाने पाठ फिरविली.

धाराशिव जिल्ह्यातही ४२ पैकी केवळ ३५ मंडलांत हलका पाऊस झाला. ८ मंडलांत १५ ते ४१ मिलिमीटर पाऊस झाला. इतर तालुक्यांच्या तुलनेत उमरगा तालुक्यात पावसाचा जोर थोडा अधिक राहिला.

जिल्हानिहाय पाऊस झालेली मंडले (मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर ः चिखलठाणा ४२.८, चित्तेपिंपळगाव ३४.५, करमाड ३४.५, हर्सूल ५७.५, कचनेर ४२.३, वरुडकाजी ४०.५, बालानगर ५७.८, गंगापूर ३७, भेंडाळा ४०.५, शेंदूरवादा ३१.५, जामगाव ३४, नागद ५१, गोळेगाव ३७.

जालना ः जाफराबाद ३०.३, कुंभारझरी ४८.५, वरुड ४८.३, वाघरूळ ३४.५, आष्टी ३१.८, सातोना ३८.८

बीड ः कडा ३१.८, तालखेड ३१.५.

लातूर ः लातूर २८.८, बाभळगाव २८.८, हरंगुळ २८.८

धाराशिव ः धाराशिव ग्रामीण ४१.३, उमरगा ३४.३, डाळिंब २९.३, मुळज ३३.३, मुरूम २४.३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

Cotton Market Price: कापूस दबावातच; तसेच काय आहेत सोयाबीन, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खरबुजाचे आजचे बाजारभाव

Crop Damage Survey: आंबा, काजू नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू

SCROLL FOR NEXT