Banana Market Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Market : केळीच्या दरात सुधारणा ; निर्यातीसह उत्तरेकडे उठाव

Banana Rate : खानदेशात केळी दरात या महिन्यात सतत सुधारणा झाली आहे. उत्तर भारतात श्रावणमास सुरू झाला आहे, यामुळे तेथून मागणी आहे.

Team Agrowon

Banana Export : खानदेशात केळी दरात या महिन्यात सतत सुधारणा झाली आहे. उत्तर भारतात श्रावणमास सुरू झाला आहे, यामुळे तेथून मागणी आहे. तसेच आखातातही खानदेशातून रोज पाच कंटेनर केळीची पाठवणूक सुरू असून दर्जेदार किंवा निर्यातीच्या केळीला १७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

केळीदर जूनच्या मध्यापर्यंत दबावात होते. एप्रिलमध्ये केळीला सरासरी ७०० व मे मध्ये सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. जूनमध्ये दुसऱ्या पंधरवड्यात केळी दरात सुधारणा झाली. दर ११०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल, असेही दर्जेदार केळीसाठी मिळाले.

या महिन्याच्या मध्यापर्यंतदेखील कमाल दर १२०० रुपयांपर्यंत होते. परंतु मागील आठ दिवसांत केळी दरात सतत सुधारणा झाली आहे. आगाप कांदेबाग केळीची काढणी सुरू झाली असून, दर्जेदार किंवा निर्यातीच्या केळीला १७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

आवकेत घट

केळीच्या आवकेत मोठी घट या महिन्यात झाली आहे. जूनमध्ये प्रतिदिन सरासरी २३० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक झाली. या महिन्यातही सुरुवातीचे आठ ते १० दिवस केळीची आवक २०० ट्रकपेक्षा अधिक होती.

परंतु मागील आठ ते १० दिवसांत केळी आवकेत सुमारे ३० ट्रकने घट झाली आहे. जळगावातील रावेर, यावल, मुक्ताईनगर या मुख्य भागांत केळी आवकेत घट झाली आहे. तर चोपडा, जळगाव, भडगाव-पाचोरा आदी भागांत केळीची आवक वाढली आहे. उत्तरेकडील मॉल व अन्य बाजारांत केळीला उठाव आहे.


निर्यातही सुरूच

केळीची आखातातील निर्यातही वेगात सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातून रोज चार कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळी आखातात पाठविली जात आहेत. तर नंदुरबारमधूनही रोज एक कंटेनर केळीची आखातात पाठवणूक सुरू आहे. सध्या जळगावातील चोपडा, जळगाव, जामनेर, पाचोरा-भडगाव या भागात दर्जेदार, निर्यातक्षम केळी काढणीसाठी उपलब्ध आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

Enterotoxemia In Goats: पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा धोका, वेळीच करा प्रतिबंध

Jowar Procurement Scam: हमीभावाने ज्वारी खरेदीमध्ये गैरव्यवहार

SCROLL FOR NEXT