Farming Success : शिक्षण घेण्याच्या वयात म्हणजे आयुष्याच्या महत्त्वाच्या वाटेवर पुसला (ता. वरुड, जि. अमरावती) येथील बिडकर कुटुंबातील पाच भगिनींना आई-वडिलांच्या निधनामुळे पोरके व्हावे लागले. परंतु आलेली संकटे, समस्यांचा त्यांनी धडाडी, धैर्याने सामना केला. समर्थपणे जबाबदारी पेलण्यासह एकमेकींच्या विश्वासातून आपली शेती व घर उभे केले. प्रतिष्ठा उंचावली. एकेकाळी केवळ संघर्षच असलेल्या बिडकर भगिनींच्या आयुष्याची बाग आता सुखाने, समाधानाने बहरून गेली आहे. .राज्यात सर्वाधिक म्हणजे एक लाख हेक्टरच्या आसपास संत्रा लागवड क्षेत्र एकट्या अमरावती जिल्हयात आहे. त्यातही मोर्शी, वरुड या दोन तालुक्यांमध्येच ८५ हजार हेक्टरवर संत्रा लागवड असावी. त्यामुळेच या भागाला विदर्भाचा कॅलिफोर्निया असे म्हटले जाते. याच वरुड तालुक्यातील पुसला गावात बिडकर कुटुंब राहते. दशरथ हे कुटुंबातील कर्ते पुरुष होते. गावातील नदीकाठच्या परिसरात अनेक कुटुंबीयांचे वास्तव्य असायचे. बिडकर कुटुंब त्यापैकीच एक होते..Tips For Business Success : 'हे' बदल केले तरचं तुम्हाला मिळेल तुमच्या व्यवसायात यश.सन १९९१ मध्ये नदीला मोठा पूर आला. अनेक घरांमध्ये पाणी शिरले, शेती खरडून गेली. हा महापूर अनेकांच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देणारा ठरला. अंगावरील वस्त्रांशिवाय अनेकांकडे काहीच शिल्लक राहिले नाही. भविष्यात देखील अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून शासनाने रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. नवी वस्ती परिसरात तीन हजार चौरस फूट जागेची उपलब्धता प्रत्येक घरासाठी करण्यात आली. ज्यांच्याकडे शेती नाही अशा कुटुंबाला पंधराशे चौरस फूट जागा देण्यात आली. त्याच परिसरात आज बिडकर कुटुंब वास्तव्याला आहे..कुटुंबावर झालेला आघातबिडकर कुटुंबाची पंढरी शिवारात चार एकर चार गुंठे इतकीच शेती आहे. यात संत्र्याची सुमारे २५० झाडे आहेत. उर्वरित क्षेत्रात कपाशी, एरंडी, तीळ यासारखी पिके घेतली जातात. दशरथ व लीलाबाई या बिडकर दांपत्याला पाच मुली. सारे काही सुरळीत सुरू असताना नोव्हेंबर २००९ मध्ये दशरथ यांचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या अडीच वर्षांनी लीलाबाई देखील हे जग सोडून निघून गेल्या. पाचही मुली पोरक्या झाल्या. हा मोठा आघात असला तरी तो सोसण्यापलीकडे या बहिणींसमोर पर्यायच नव्हता. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने घर चालविण्याची संपूर्ण जबाबदारी बहिणींवर आली. त्यासाठी शाळा सोडून मजुरी काम करून कुटुंबाचा गाडा हाकला जाऊ लागला. त्यामुळे पाचही बहिणींचे उच्चशिक्षणाचे स्वप्न अपूर्णच राहिले..Farmer Success Story : भाताला भाज्या-केळीची जोड शेतीचे अर्थकारण झाले गोड .जगण्यासाठी संघर्षसर्वांत मोठी बहीण असलेल्या माधुरीने कसेबसे दहावीपर्यंतचे धडे गिरविले. नलू ही बीए द्वितीय वर्षापर्यंतचा पल्ला गाठू शकली. सुनंदा ही त्यांच्याइतकी देखील भाग्यवान ठरली नाही. तिला आठवी इयत्तेतच शिक्षण सोडावे लागले. चौथ्या क्रमांकावरील सुचिताने कसेबसे बीए.चे (इंग्रजी वाङ्मय) शिक्षण पूर्ण केले. पाचव्या क्रमांकावरील मंगला ऊर्फ बेबीने बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा पल्ला गाठला. संघर्षांच्या वाटेवर मजुरी कामातील बहुतांश हिस्सा दैनंदिन गरजांवर खर्ची होत होता. त्यातून शिल्लक रकमेचा विनियोग शिक्षणासाठी व्हायचा. .बिडकर बहिणी मोठ्या हिंमतवान. धडाडीच्या. प्राप्त परिस्थितीत एकमेकींच्या सानिध्यात आनंदी, समाधानी आयुष्य जगण्याची त्यांची धडपड सुरू होती. इतरांकडे मजुरी करताना त्यांच्या गाठीला शेतीचा अनुभवही जमा झाला होता. घरच्या शेतात तसा लहानपणापासून संबंध देखील आला होताच. परिणामी आई-वडिलांच्या मृत्यूनंतर शेतीत कौशल्य मिळवणे त्यांना कठीण गेले नाही. सर्व बहिणींनी जिद्दीने शेती कसली. मजुरी काम व घरची शेती यातून येणाऱ्या उत्पन्नातून सन २००० मध्ये माधुरीचा, २००८ मध्ये नलू तर त्यानंतर सुनंदाचा विवाह पार पडला. कुटुंबात एक महत्त्वाचा पल्ला आता पार पडला होता.(संपूर्ण लेख वाचा २०२५ च्या अॅग्रोवन दिवाळी अंकात)अंक खरेदीसाठी लिंक- https://shorturl.at/TJmdc.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.