सजल कुलकर्णीFarmers Life: सुखाची शेती हा व्यक्तिगत निर्णय नव्हे तर कृषी धोरणाचा केंद्रबिंदू म्हणून उदयाला आली पाहिजे. शेती हे केवळ आर्थिक उत्पादनाचे साधन नाही, तर ती शाश्वत जीवनाचा आधार आहे. शेतकरी, जमीन, पिके, प्राणी, पाणी व हवामान यांचा योग्य समन्वय साधल्यास टिकाऊ, पर्यावरणपूरक व समृद्ध शेती साध्य होते. त्यातून सुखाच्या शेतीचा मार्ग सापडेल. शेतीसुख म्हणजे फक्त उत्पन्न नाही, तर जीवनात शांती, सुरक्षितता व नैसर्गिक संतुलन मिळवणे. त्या दृष्टीने शाश्वत शेतीपद्धती कृषी धोरणाच्या केंद्रस्थानी आली तर स्थानिक ज्ञान, पारंपरिक पद्धती व आधुनिक तंत्रज्ञानाचा समन्वय साधून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल, अन्नसुरक्षा सुनिश्चित होईल आणि पर्यावरणीय संतुलनही टिकेल..सध्या मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले आहे. पिके पाण्यात बुडाली, काही ठिकाणी सडली, तर काही ठिकाणी शेतांमध्ये उभे राहिलेले पाणी अजूनही निचरा झालेले नाही. यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे हातातून निघून गेल्यासारखा आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी आहेत आणि आता या नुकसानीमुळे ते कायमचे तुटल्यासारखे वाटत आहेत. उत्पादनाचा आधार न राहिल्यामुळे जनावरांसाठी चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती केवळ आर्थिक नाही, तर मानसिक ताण निर्माण करणारी आहे. त्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये असुरक्षितता, भविष्याबद्दल चिंता आणि अस्थैर्य जाणवते..Agriculture Success Story : व्यावसायिक पीक पद्धतीद्वारे शाश्वतीची दिशा.भारतामधील अन्न व शेती व्यवस्था आज एका नाजूक स्थितीत आहे. हवामान बदलामुळे दुष्काळ, पूर आणि उष्णतेचा फटका बसल्याने पिकांचे उत्पादन घटत आहे आणि ग्रामीण उपजीविकेवर विपरीत परिणाम होत आहेत. जैवविविधतेचा ऱ्हास, मातीची सुपीकता कमी होणे, पिकांचे उत्पादन कमी होणे तसेच लोकांच्या आहारातील पोषणमूल्य आणि विविधतेत घट ही समस्यांची नोंद आहे. पारंपरिक, रासायनिक संसाधनांवर आधारित शेती पद्धती आता पर्यावरणीय व आर्थिक मर्यादांना पोहोचल्या आहेत. नागरिकांकडून सुरक्षित व पौष्टिक अन्नाची मागणी वाढत असून, या मागणीला अनुकूल धोरणात्मक नियोजन व पर्याय शोधणे हे महत्त्वाचे आव्हान ठरले आहे..भारतीय शेतकरी: स्थिती आणि समस्याभारतामधील बहुसंख्य शेतकरी लघू व अल्पभूधारक आहेत. त्यांच्याकडे सरासरी एक हेक्टरपेक्षा कमी शेतीयोग्य जमीन असते. शेतकरी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न सहसा एक लाख रुपयांपेक्षा कमी असते आणि केवळ शेतीवर आधारित उपजीविका त्यांना शक्य नसते. परिणामी, उत्पन्नाचे स्रोत विविध प्रकारचे असतात – मजुरी, स्थलांतर, लघुउद्योग यासारखे. या परिस्थितीमुळे शेतकरी कुटुंबांची उपजीविका सतत हवामान व बाजारपेठीय अनिष्टांच्या आहारी राहते. बाजारातील अस्थिरता आणि असमान रचना यामुळे लहान शेतकऱ्यांना उत्पादनाला योग्य भाव मिळवणे व स्पर्धेत टिकणे कठीण होते. परिणामी, या शेतकरी वर्गाची अस्थिरता आणि असुरक्षितता वाढते..शेतकरी विविध शेतीपद्धती वापरतात. पारंपरिक शेतीपद्धतीत त्यांचे पाऊस आणि नैसर्गिक खतांवर अवलंबित्व होते. त्याचा फायदा म्हणजे मातीची गुणवत्ता टिकते आणि खर्च कमी होतो, पण अतिवृष्टी किंवा दुष्काळात पिकांचे नुकसान होऊ शकते. आधुनिक पद्धतीत यंत्रसाहित्य, रासायनिक खत आणि सिंचनाचा वापर केला जातो. त्यामुळे उत्पादन जास्त होते पण खर्चही जास्त आणि पर्यावरणावर परिणाम होतो. काही शेतकरी मिश्रित पद्धती वापरतात, जिथे पिके आणि पशुपालन एकत्र केले जाते. त्यामुळे खत मिळते, जोखीम कमी होते आणि पर्यावरण संवर्धन होते. सध्या जगात सुमारे एक अब्ज लोक उपासमारीचे आणि गरीबीचे जीवन जगत आहेत, त्यापैकी ७५ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात आणि शेतीवर अवलंबून आहेत. .बहुतेकजण लहान प्रमाणातील पीक–पशुपालन प्रणालींवर अवलंबून आहेत, काही दीर्घ कालावधीच्या पशुपालन प्रणालींशीही जोडलेले आहेत. पशुपालन उत्पादनांची (मांस, दुग्धजन्य पदार्थ, अंडी इ.) मागणी लक्षणीय वाढत असल्याने लहान आणि विशेष पशुपालकांसाठी उत्पन्न व रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. ही वाढती मागणी टिकविण्यासाठी चांगल्या शेती पद्धतींची अंमलबजावणी, योग्य धोरणात्मक वातावरण निर्माण करणे आणि पर्यावरणीय व आरोग्याशी संबंधित आव्हानांवर उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. शाश्वत पशुपालन व्यवस्थापन अन्नसुरक्षा आणि ग्रामीण उपजीविका सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे ठरते..Spice Industry Success Story: पारंपरिक मसाल्यांचा तयार झाला ब्रॅण्ड.कृषी-पर्यावरणीय (Agroecology) दृष्टिकोनकृषी-पर्यावरणीय (Agroecology) पद्धती ही शाश्वत शेती साधण्यासाठी एक आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धती आहे. या पद्धतीमध्ये शेतकरी, जमीन, पाणी, हवामान, पिके आणि प्राणी यांच्यातील परस्पर संबंध समजून घेतले जातात आणि त्यांचा समन्वय साधला जातो. फक्त उत्पादन वाढवणे पुरेसे नाही तर शेतकरी कुटुंबाची एकूण उपजीविका, उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर, हवामान व बाजारातील जोखीम कमी करणे आणि आपत्तीला प्रतिसाद क्षमता निर्माण करणे हे देखील महत्त्वाचे आहे, असे या पद्धतीत मानले जाते. त्यामुळे शेतकरी अधिक सक्षम होतो, बाजारातील असमानतेशी सामना करतो आणि उत्पादन टिकाऊ राहते..मिश्र शेती आणि पशुपालनकोरडवाहू क्षेत्रात मिश्र शेती हा प्रभावी पर्याय आहे. यात विविध पिकांचा समावेश केला जातो उदा. धान्य, डाळी, भाजीपाला, फळे इ. त्यामुळे उत्पादनात स्थिरता राहते आणि हवामानातील अनिश्चिततेपासून संरक्षण मिळते. पशुपालनाचे महत्त्व देखील तितकेच आहे. मेंढ्या-बकरी चराईसाठी कुरणांचा वापर प्रभावी पद्धतीने केला जातो, ज्यामुळे पशूंचे आरोग्य टिकते आणि चराईतून मिळालेला शेणखत शेतीसाठी वापरता येते. दूध, लोकर आणि मांस यांसारखी उत्पादने स्थानिक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेस हातभार लावतात. लहान शेतकऱ्यांच्या पीक- पशुपालन प्रणालीत किंवा इतर मोठ्या किंवा लहान शेती प्रणालीत उत्पादन वाढवणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे लोकांचे जीवन सुधारता येते आणि सामाजिक व आर्थिक बदल घडविण्यासाठी वेळ मिळतो. पीक आणि पशुपालन एकत्र करण्याने शेतात उत्पादन वाढते, पर्यावरण टिकते आणि शेतीत विविधता येते. यामुळे शेतीतून अधिक उत्पन्न मिळते आणि लोक फक्त विशिष्ट पद्धतीवर अवलंबून राहत नाहीत..मिश्रित प्रणालींमुळे शेतातील विविध उपक्रम एकमेकांना पूरक ठरतात. कामासाठी असलेले बैल ऊर्जा आणि शेण देतात, तर पिकाचे अवशेष पशुपक्ष्यांना खायला दिले जातात. या एकत्रीकरणामुळे शेतकऱ्यांना अनेक उत्पन्नाचे स्रोत मिळतात; जे पीक नुकसान किंवा पशुवैद्यकीय आजारांपासून संरक्षण देतात. या पद्धतीची कार्यक्षमता चांगल्या प्रकारे पीक फेरफार करून त्याद्वारे आणखी सुधारली जाऊ शकते. विशेषतः अशा दोन उद्देश असलेल्या पद्धतीचा समावेश केल्यास मानवांसाठी अन्न आणि पशूंसाठी चारा उपलब्ध होतो. अशा पद्धतींमुळे एकूण शेतीची उत्पादकता वाढते..बैलशक्ती हा पारंपरिक व शाश्वत कृषी पद्धतीतील मुख्य घटक आहे. पीक पेरणी, खत मिसळणे, शेणखत टाकणे व माती तयार करण्यासाठी बैलशक्ती वापरली जाते. त्यामुळे शेती अधिक आर्थिक व पर्यावरणपूरक बनते, तसेच इंधनावरील अवलंबित्व कमी होते. स्थानिक ज्ञान, स्थानिक पर्यावरण, मिश्र शेती, मेंढ्या-बकरी पालन आणि बैलशक्ती यांचा समन्वय करून शाश्वत व समावेशक विकास साधणे आवश्यक आहे.(संपूर्ण लेख वाचा २०२५ च्या अॅग्रोवन दिवाळी अंकात)अंक खरेदीसाठी लिंक- https://shorturl.at/TJmdc.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.