Grape Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Rate : द्राक्षाच्या दरात सुधारणा

Grape Market : गेल्या आठवड्यापासून द्राक्षास पोषक वातावरण निर्माण झाल्याने द्राक्षाला गोडी, रंग आणि वजन मिळू लागले आहे. त्यामुळे बाजारात द्राक्षाला चांगली मागणी असून उठावही होऊ लागला आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : गेल्या आठवड्यापासून द्राक्षास पोषक वातावरण निर्माण झाल्याने द्राक्षाला गोडी, रंग आणि वजन मिळू लागले आहे. त्यामुळे बाजारात द्राक्षाला चांगली मागणी असून उठावही होऊ लागला आहे.

यामुळे गेल्या तीन दिवसांत बाजारपेठेत द्राक्षाच्या दरात प्रतिकिलो ४ ते ५ रुपयांनी वाढ झाली. सध्या द्राक्षाला दर्जानुसार प्रति चार किलोस १२० रुपयांपासून ते ३२० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.

राज्यातील ३० टक्के क्षेत्रावरील द्राक्ष काढणी पूर्ण झाली आहे. अजून ७० टक्के क्षेत्रावरील द्राक्ष काढणी शिल्लक आहे. द्राक्ष हंगामाला गती येऊ लागली आहे. यंदाचा द्राक्ष हंगाम सुरू झाल्यानंतर वातावरण बदलत असल्याने द्राक्षाची गोडी, रंग आणि जाडी वाढण्यास अडथळे निर्माण झाले होते.

अशा परिस्थितीतही द्राक्ष हंगाम सुरू झाला होता. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात १० ते १५ टक्के क्षेत्रावरील द्राक्षाची विक्री झाली होती. यादरम्यान, द्राक्षाला प्रतिकिलो २५ ते ४० रुपये होता. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली होती.

गेल्या आठवड्यापासून वातावरणात बदल झाला असून हे बदलते वातावरण द्राक्ष बागेस पोषक आहे. यामुळे द्राक्षाची गोडी, रंग आणि जाडी वाढण्यासाठी मदत होत आहे. त्यातच थंडीची लाटही कमी झाली आहे. त्यामुळे उत्तरभारतासह अन्य देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षाची मागणी वाढू लागली असून द्राक्षाचा उठावही होत आहे.

त्यामुळे एका महिन्यानंतर गेल्या चार दिवसांपासून द्राक्षाच्या दरात पहिल्यांदाच प्रतिकिलो ४ ते ५ पाच रुपयांची वाढ झाली आहे. सध्या द्राक्षाच्या दर्जेनुसार प्रति चार किलोस १२० रुपयांपासून ते ३२० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दर टिकून राहण्याची शक्यता

बाजारपेठेत द्राक्षाची मागणी वाढली असून प्रत्येक विभागनिहाय द्राक्ष काढणीला गती आली आहे. सध्या वातावरण चांगले असून वातावरण असेच राहिले तर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दर टिकून राहतील. एप्रिलमध्येही चांगले दर मिळतील, असा अंदाज द्राक्ष उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

वाणानुसार द्राक्ष दर (रुपये प्रतिकिलो)

ब्लॅक - ६० ते ८०

व्हाईट - ३० ते ४५

रेड - ७० ते ८०

हंगाम सुरू झाल्यापासून पहिल्यांदा द्राक्षाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे दिसाला मिळाला असून मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दर टिकून राहतील असा प्राथमिक अंदाज आहे.
- शिवाजी पवार, अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू, शेतकऱ्यांना मदत, सवलती मिळणार- कृषिमंत्री भरणे

Sindhudurg Eco Sensitive Zone: पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात सिंधुदुर्गातील १९८ गावांचा समावेश

Water Management: धरणनिहाय पाणीसाठ्याचे नियोजन करावे : जिल्हाधिकारी

Karnataka Drought Relief: कर्नाटकातील ५० लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, प्रत्येकी २,५०० रुपयांचे कृषी निविष्ठा अनुदान जाहीर

Rabi Season: यंदाच्या रब्बी हंगामासाठी महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT