Gramsevak Bribe news Agrowon
ॲग्रो विशेष

Gramsevak Bribe News : लाचखोर ग्रामसेवकाला कारावासाची शिक्षा

Bribe news : सिंचन विहीर प्रकरण मंजुरीच्या मोबदल्यात घेतली ५ हजारांची लाच

Team Agrowon

Nashik News : नाशिक : सुरगाणा तालुक्यातील सिंचन विहीर बांधण्याचे प्रकरण मंजूर करण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तत्कालीन ग्रामसेवकास न्यायालयाने एक वर्ष कारावास व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

मनोहर जगन्नाथ हिरे (रा. सुरगाणा) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव असून, हा प्रकार लाचेची घटना डिसेंबर २०१६ मध्ये घडली होती.

तक्रारदार धनराज लक्ष्मण भोये यांची वडिलोपार्जित शेतजमीन असून, त्यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर बांधण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला होता.

हा प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठविण्याच्या मोबदल्यात तत्कालीन ग्रामसेवक हिरे याने ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

भोये यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने १९ डिसेंबर २०१६ रोजी सुरगाणा पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर सापळा रचला आणि लाचखोर हिरे यास लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले होते.

याप्रकरणी सुरगाणा पोलिसात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. सुधीर कोतवाल यांनी युक्तिवाद केला. त्यात त्यांनी तीन साक्षीदार तपासले.

गुन्हा झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन जिवणे यांनी हिरे यास शिक्षा सुनावली.या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे प्रदीप काळोगे व ज्योती पाटील यांनी तपास व पाठपुरावा केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Market Committee Privatization: बाजार समित्या अदानी-अंबानींच्या घशात घालण्याचा डाव; नहाटा यांचा गंभीर आरोप

Sugarcane Crop Management: गारपीटग्रस्त स्थितीतील ऊस पिकाचे व्यवस्थापन

Low Cost Feed Management: कमी खर्चात जनावरांचे खाद्य आणि चारा व्यवस्थापन

Quality Seeds Selection: वाण निवडीत दाखवा खरे शहाणपण

External Parasites Control: जनावरातील बाह्य परजीवींचे नियंत्रण

SCROLL FOR NEXT