Kanda Chal Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Kanda Chal Yojana: ‘मागेल त्याला कांदाचाळ’ योजना राबवा

Government Scheme: राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौरपंप व शेततळे’ ही योजना राबवली. त्यांचा हजारो शेतकऱ्यांना फायदा होत आहे. याच धर्तीवर आता ‘मागेल त्याला कांदाचाळ’ ही योजना राबविण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकरीवर्ग करीत आहेत.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Daund News: राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौरपंप व शेततळे’ ही योजना राबवली. त्यांचा हजारो शेतकऱ्यांना फायदा होत आहे. याच धर्तीवर आता ‘मागेल त्याला कांदाचाळ’ ही योजना राबविण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकरीवर्ग करीत आहेत. ही योजना राबविल्यास शेतकऱ्यांचा कांदा साठवणुकीचा मोठा प्रश्न मार्गी लागेल. बाजारभाव वाढल्यावर साठवलेल्या कांदाविक्रीतून अधिक फायदा होईल. यामुळे योजना सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

दौंड तालुक्यात मागील काही वर्षांमध्ये कांदा पिकांची लागवड वाढली आहे. सुरुवातीला कांद्याचे बाजारभाव दहा ते पंधरा रुपयांपर्यंत येत असल्याने शेतकरी कांदाचाळी तयार करून साठवणूक करतात. परंतु सर्वच शेतकऱ्यांना कांदाचाळ करणे शक्य होत नाही. यामुळे काही शेतकऱ्यांना नाइलाजास्तव कमी बाजारभावात कांदा विकावा लागत आहे. यामुळे उत्पन्नात घट आहे.

दरम्यान, मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मागेल त्याला शेततळे व मागील वर्षांपासून मागेल त्याला सौरपंप ही योजना चालु केली आहे. तालुका कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कांदाचाळ योजना सुरू आहे. मात्र त्यात काही अटी आहेत, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले.

अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

कृषी विभागाच्या महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी कांदाचाळीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा, असे आवाहन दौंड तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ भेटणार

मागेल त्याला कांदाचाळ ही योजना तातडीने सुरू करावी. कांदाचाळीचे अनुदान दुप्पट करावे. यासह इतर मागण्याबाबत लवकरच शेतकऱ्यांचे शिष्टमंङळ उपमख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहे.

अशी आहे सद्य:स्थिती

ड्रॉ पद्धतीने कांदाचाळीसाठी शेतकऱ्यांची निवड केली जाते.

शेतकऱ्यांना कांदाचाळीसाठी निवड होण्यासाठी वाट पाहावी लागते.

मागील दोन वर्षांमध्ये कांदाचाळीसाठी लाभार्थ्यांची निवड झालेली नाही.

सध्या एससी व एसटी वर्गातील लाभार्थींची निवड झाली

साधारणपणे वर्षभरात ५० कांदाचाळी तालुक्यात पूर्ण होत आहेत.

लाभार्थी निवड तातडीने होत नसून, अनेक अटी घातलेल्या आहेत.

निवड झालेल्या शेतकऱ्यांना कांदाचाळीच्या बांधणीनुसार अनुदान दिले जाते. परंतु मजुरी व साहित्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे अनुदानात मोठी वाढ करावी.
कैलास गिरमकर, प्रगतिशील कांदा उत्पादक शेतकरी, देऊळगाव राजे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT