Ladka Bhau Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Ladka Bhau Yojana : शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सरकारने राबवावी ‘लाडका भाऊ’ योजना

Farmer's Son Marriage Issue : शेतकरी कुटुंबातील पाल्यांच्या लग्नाचा विषय नजीकच्या काळात गंभीर झाला आहे. शेतकरी नवरा नको गं बाई ! असाच सुर शेतकरी कुटुंबातील मुलींच्याच पालकांकडून आवळला जात आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Bhandara News : शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही. त्यामुळे अनेकांचे लग्नाचे वय निघून गेले आहे. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहिणीच्या धर्तीवर शेतकरी पाल्यांसाठी वधू मिळावी या उद्देशातून ‘लाडका भाऊ योजना’ राबवावी, अशी मागणी कऱ्हाडला येथील जयपाल प्रकाश भांडारकर (वय २७) या युवकाने केली आहे.

शेतकरी कुटुंबातील पाल्यांच्या लग्नाचा विषय नजीकच्या काळात गंभीर झाला आहे. शेतकरी नवरा नको गं बाई ! असाच सुर शेतकरी कुटुंबातील मुलींच्याच पालकांकडून आवळला जात आहे. त्यामुळे देखील हा प्रश्‍न चिंतेचा होऊन बसला आहे. शेतकरी कुटुंबातील पालकच शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देण्यास इच्छुक नाहीत.

मुलाच्या कुटुंबीयांकडे शेती असावी त्यासोबतच वर मुलगा शासकीय नोकरदार असावा अशी सर्वांची अपेक्षा आहे. वधू पालकांच्या या इच्छा पूर्णत्वास जात नसल्याने लाखांवर मुलांचे लग्न होऊ शकले नाहीत. परिणामी हा प्रश्‍न सामाजिकस्तरावर गंभीर प्रश्‍न झाला आहे. त्यातच अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केली.

त्या अंतर्गत महिलांना महिना १५०० रुपये मिळणार आहेत. त्याच धर्तीवर शेतकरी पाल्यांच्या लग्नाचा विषय गांभीर्याने घेत त्यांच्याकरिता देखील लाडका भाऊ ही योजना घोषित करावी, अशी मागणी जयपाल भांडारकर यांनी केली आहे.

लाखांदूर येथील मुख्य रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभा राहत हातात फलक घेत ही अभिनव मागणी जयपाल यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी मुलगी देईना...

शेतकऱ्यांच्या मुलांना कुणी लग्नासाठी मुलगी द्यायला तयार होईना. मुख्यमंत्री साहेब जमलं तर नक्‍की लाडका भाऊ योजनासुद्धा आणा अशी आर्जव जयपाल भांडारकर यांनी केली आहे. हातात तसा फलक घेत त्यांनी अनेकांचे लक्ष्य वेधून घेतले होते. अनेक युवक, युवतींनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपून घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT