Ground Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Ground Water Level : भूजल पातळी वाढविण्याचा घोरवड पॅटर्न राबवा

Ground Water Update : घोरवड (ता. सिन्नर) येथे भूजल पातळी वाढविण्यासाठी रिचार्ज शाफ्ट पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. या पद्धतीत कूपनलिका घेऊन भूगर्भात पाणी मुरविले जाते.

Team Agrowon

Nashik News : घोरवड (ता. सिन्नर) येथे भूजल पातळी वाढविण्यासाठी रिचार्ज शाफ्ट पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. या पद्धतीत कूपनलिका घेऊन भूगर्भात पाणी मुरविले जाते. परिणामी, या पद्धतीमुळे घोरवड येथील भूजल पातळीत वाढ झाली असल्याचे केंद्रीय भूजल मंडळाचे संशोधक पंकज बक्षे यांना दिसून आले.

त्यामुळे घोरवड पॅटर्न हा जिल्हाभर राबविण्याच्या सूचना त्यांनी या वेळी ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेला दिल्या. जिल्ह्यात पावसाळा संपल्यावर भूजल पातळीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयांतर्गत जलशक्ती अभियानाच्या अनुषंगाने भूजल पातळीत वाढ करण्यासाठी राबविण्यात आलेल्या गावांना भूजल संशोधक पंकज बक्षे यांनी नुकत्याच भेटी दिल्या.

इगतपुरी व सिन्नर तालुक्यांतील गावांना त्यांनी भेटी देत पाहणी केली. या वेळी जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक पी. पी. बधान, सहायक अभियंता महेश देवरे उपस्थित होते.

इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गावात भेट दिली असता येथील विहिरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले. गोंदे येथील राबविण्यात आलेल्या अभियानातील जलस्रोतांची पाहणी केली. यात पाणीपातळी वाढलेली दिसली. घोरवड (ता. सिन्नर) येथे राबविल्या गेलेल्या रिचार्ज शफ्ट पद्धतीमुळे भूगर्भात पाण्याच्या पातळीत चांगली वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले.

त्या वेळी संशोधक बक्षे यांनी रिचार्ज शफ्ट पद्धतीचा चांगला परिणाम झाला असून, हा प्रयोग जिल्ह्यातील इतर तालुक्यांत राबविल्यास पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होऊ शकते, असे सांगितले. प्रत्येक तालुक्यात भूजल पातळीत वाढ होण्यासाठी कामे घ्यावीत, अशा सूचना त्यांनी या वेळी केल्या. त्यानंतर, बक्षे यांनी शहरातील रेन हार्वेस्टिंग केलेल्या इमारतींची पाहणी केली.

कॉलेज रोडवरील सीआयडी वसाहतीतील इमारतीची त्यांनी पाहणी केली. कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी जिल्ह्यात भूजल पातळीत वाढ होण्याकरिता सुरू असलेल्या विविध कामांची माहती देत, जिल्ह्यातील झालेला पाऊस, धरणसाठा या बाबतची माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Harvesting: कापूस वेचणीसाठी मजूर देता का मजूर

Mumbai Redevelopment: मुंबईकरांना दिलासा! ६०० चौरस फुटांपर्यंत नोंदणी फी माफ, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Banana Price Crash: वीस एकर केळीवर फिरविला रोटावेट

Municipal Council Polls: नांदेडमध्ये १२ नगरपरिषदा, एक नगरपंचायत अध्यक्षपदासाठी २१२ अर्ज

Hybrid Banana: जळगावच्या संकरित केळीचे विक्रमी उत्पादन

SCROLL FOR NEXT