Ground Water Management : भूजलाचे व्यवस्थापन आव्हानात्मक : जोशी

वाढती लोकसंख्या, हवामानातील बदल, भूजलाचे प्रदूषण, सतत बदलते भूभाग यांमुळे भूजलावर होणारा परिणाम व या सोबतच राज्यातील दोलायमान पर्जन्यमान व कठीण पाषाणाची भूरूपीय संरचना या सर्व बाबींमुळे भूजलाचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक झाले आहे.
Ground Water Management
Ground Water ManagementAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘वाढती लोकसंख्या, हवामानातील बदल (Climate Change), भूजलाचे प्रदूषण, सतत बदलते भूभाग यांमुळे भूजलावर होणारा परिणाम व या सोबतच राज्यातील दोलायमान पर्जन्यमान व कठीण पाषाणाची भूरूपीय संरचना या सर्व बाबींमुळे भूजलाचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक झाले आहे,’’ असे मत राज्याचे भूजल आयुक्त चिंतामणी जोशी यांनी व्यक्त केले.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत भारतीय प्रौद्योगिकी संस्थान आणि विश्वकर्मा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीतर्फे राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पा अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन पुणे येथे नुकतेच करण्यात आले.

या वेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच. डी. धुमाळ, डॉ. विजय वाघमोडे, डॉ. श्रीकांत शिंदे, प्रा. श्रीनिवास लोंढे, डॉ. प्रज्ञा दीक्षित, डॉ. प्रीती कुलकर्णी आदी उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले.

Ground Water Management
Water Management : मृद्‍, जलसंधारणासाठी अनघड दगडी बांध, गॅबियन बंधारा असे उपाय अवलंबणे गरजेचं

जोशी म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर भूजलाच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी करून सर्वसामान्य नागरिकांना उपयुक्त माहिती पुरविण्यासाठी भूजल विभागाने इतिहासात प्रथमच पावले उचलली आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्र अध्ययनाचा वापर करून उपयुक्त प्रणाली जसे की भूजल पातळीचा अंदाज, भूजल गुणवत्तेचे अनुमान, पर्जन्यमान व पुनर्भरणाचा परस्पर संबंध इ. उपक्रम हाती घेण्यात येतील. याचा उपयोग भूजलाचा ऱ्हास होऊ नये म्हणून धोरणात्मक उपाययोजना आखण्यासाठी होईल.

भूजलाच्या वापरकर्त्यांना पीक-पाणी नियोजन, आजूबाजूच्या परिसरातील भूजल गुणवत्ता राखणे, नवीन विहिरी व बोअरवेल घेण्यासाठीही याचा फायदा होईल. त्याची पूर्वतयारी म्हणून भूजल विभागाने १:१०,००० स्केल वर मॅपिंग करणे, डेटा डिजिटायझेशन व निर्णय आधार प्रणाली विकसित करण्याचे काम सुरु केले आहे.’’

भाग्यश्री मग्गीरवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रज्ञा दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com