Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा

Crop Damage Survey : पूरस्थितीत एक व्यक्ती वाहून गेल्याची नोंद झाली. तसेच १ पशूधन दगावले आहे. जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तुरीचे देखील नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Washim News : जिल्ह्यात गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी यंत्रणांना दिले.

श्रीमती बुवनेश्वरी यांनी मंगळवारी (ता. तीन) संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत प्रत्यक्षपणे विविध ठिकाणी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी यंत्रणांना सूचना केली. जिल्ह्यात रविवार (ता. १) व सोमवारी (ता. २) मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. काही मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

पूरस्थितीत एक व्यक्ती वाहून गेल्याची नोंद झाली. तसेच १ पशूधन दगावले आहे. जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तुरीचे देखील नुकसान झाले आहे. ३५५.८० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात सर्वाधिक नुकसान मानोरा तालुक्यात झाले आहे.

जिल्ह्यात झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना करत घरांची पडझड झालेल्या बाधितांना आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. पूरस्थितीमुळे ग्रामीण भागात वीजपुरवठा आणि पिण्याच्या पाण्याची अडचण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

या वेळी त्यांच्यासोबत कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, मानोरा तहसीलदार संतोष यावलीकर, मंगरूळपीर तहसीलदार शीतल बंडगर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT