Rabi Irrigation
Rabi Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Jaykwadi Dam : ऊर्ध्व धरणातून जायकवाडी धरणात तत्काळ पाणी सोडा

Team Agrowon

Parbhani News : समन्यायी पाणी वाटपाच्या सूत्रानुसार ऊर्ध्व धरणातून जायकवाडी धरणामध्ये तत्काळ पाणी सोडण्यात यावे. जायकवाडी धरणातून रब्बी हंगामासाठी सिंचन आवर्तने सोडण्यात यावीत, अशी मागणी भारतीय जनता पक्ष (ग्रामीण) सरचिटणीस तथा परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास बाबर यांनी जलसंपदा मंत्री तसेच जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे केल्या आहेत.

या वर्षी मराठवाड्यात नांदेड वगळता इतर एकाही जिल्ह्यात अपेक्षित सरासरी एवढा पाऊस झाला नाही. या विभागातील ८७६ लघू, मध्यम प्रकल्पासह बंधाऱ्यातील उपयुक्त पाणीसाठा ३१ टक्क्यांच्या जवळपास आहे. जायकवाडी धरणात ४७ टक्के एवढाच पाणीसाठा आहे.

मराठवाड्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असून पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगासाठी पाण्याची अत्यंत गरज आहे. पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जलसंपत्ती प्राधिकरणाच्या तत्त्वानुसार व मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून समन्यायी पाणी वाटपाचे सूत्रांप्रमाणे तात्काळ जायकवाडी जलाशयात पाणी सोडावे.

या वर्षी गिरणा धरण वगळता ऊर्ध्व भागातील सर्वच धरणात ९० ते १०० टक्के तर जायकवाडी ४७ टक्के पाणीसाठा आहे. जायकवाडीमध्ये किमान ६५ टक्के पाणीसाठा उपलब्ध व्हावा यासाठी वरच्या भागातील धरणातून तत्काळ पाणी सोडण्यात यावे. सध्या नदीपात्र ओले आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्य कमीत कमी होऊ शकतो.

यापूर्वी २०१४.२०१५, २०१८ यावर्षी वरच्या धरणातून सोडलेले पाणी ५० टक्के वाया गेले होते. तशी परिस्थिती यंदा होता कामा नये यासाठी तत्काळ पाणी सोडण्याची मागणी मराठवाड्यातील जनतेच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी विलास बाबर, मुंजाजी सूर्यवंशी, अरुण ईखे, परमेश्वर गव्हाने, अंकुश तवर, बालाजी बिराजदार, गंगाधर गव्हाने आदीने केल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Controlled Tourism : संवेदनशील क्षेत्रात हवे नियंत्रित पर्यटन

Agriculture Policy : पंतप्रधानांचा शेती क्षेत्राबद्दलचा दावा अन् वास्तव

Agriculture Award : कृषी पुरस्कार निवडीची राज्यभर प्रक्रिया सुरू

Crop Competition : पीक स्पर्धांसाठी अर्ज स्वीकारणी सुरू

Crop Loan : शेतकऱ्यांना ९६ टक्के पीककर्जाचे वितरण

SCROLL FOR NEXT