Chandrapur DCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Chandrapur DCC Bank : चंद्रपूर जिल्हा बँकेची पदभरती रद्द करा

DCC bank Recruitment : चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या लिपिक आणि शिपाई पदाच्या ऑनलाइन परीक्षेत पहिल्याची दिवशी बिघाड आल्याने केंद्र बदलावे लागले.

Team Agrowon

Chandrapur News : चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या लिपिक आणि शिपाई पदाच्या ऑनलाइन परीक्षेत पहिल्याची दिवशी बिघाड आल्याने केंद्र बदलावे लागले. त्यामुळे परीक्षार्थ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला, असा आरोप परभणीचे दत्ता पौळ यांनी केला.

दरम्यान या परीक्षेत अनियमितता झाली. त्यामुळे नोकरभरती रद्द करून नव्या कंपनीकडून घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. परीक्षा घेणारी कंपनी बोगस आहे. परीक्षेत विचारलेले प्रश्न चुकीचे होते. आक्षेप घेतल्यानंतरसुद्धा काहीच कार्यवाही झाली नाही. यासंदर्भात बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी कंपनीकडे विचारणा केली.

परंतु कंपनीने गुण वाढवून दिले नाही. २१ डिसेंबरला संगणकात घोळ झाला. अनेक प्रश्न चुकीचे होते. २२ डिसेंबरला जालना परीक्षा केंद्रावरील परीक्षा रद्द केली. तिसऱ्या दिवशी २३ डिसेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षा घेण्यात आली. त्याची पूर्वसूचना आदल्या रात्री देण्यात आली.

शेवटचा पेपर २९ डिसेंबरला जालना केंद्र असताना नांदेड येथे परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे मुलांना आर्थिक भुर्दंड बसला. ९ ते ५ जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदवायचे होते. मात्र, उत्तरपत्रिकेत बदल केले नाहीत. १२ तासांच्या आता निकाल लावला आणि मुलाखती सुरू केल्या, असे पौळ म्हणाले. पौळ यांना लिपिक पदाच्या परीक्षेत ६५ गुण मिळाले.

त्यांच्या मित्राला ५७ गुण आहेत. मात्र, त्यांना मुलाखतीला बोलविण्यात आले नाही. आयटीआय कंपनीचे हेल्पलाइन क्रमांक आणि मेल बंद आहे. उत्तर बरोबर असतानाही गुण देण्यात आली नाहीत. यासंदर्भात आयटीआयकडे विचारणा केली मात्र २४ तासांनंतरही त्यात बदल करण्यात आली नाही, असा आरोप परभणीचे दत्ता पौळ यांनी या वेळी केला.

उपोषण सुरूच

आरक्षण बचाव संघर्ष समितीचे मनोज पोतराजे आणि रमेश काळबांडे यांचे उपोषण सुरूच आहे. पोतराजे यांच्या उपोषणाचा गुरुवारी (ता. २३) सातवा दिवस आहे. त्याची प्रकृती खालावली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Farming: खानदेशात १० टक्के क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता

Farmer Leaders Clashes: कांदादर बैठकीत शेतकरी संघटनांच्या नेत्यांत खडाजंगी

Pune APMC: भुसार वस्तूंवरील शुल्कामुळे महागाईत भर पडणार

Mumbai APMC Action: मुंबई बाजार समितीत अन्न, औषध प्रशासनाची कारवाई

Monsoon 2026: मॉन्सूनची आगेकूच

SCROLL FOR NEXT