Illegal Sand Excavation  Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Sand Excavation : अमळनेर तालुक्यात वाळूचा अवैध उपसा सुरूच

Amalner Sand Mafia : गेल्या अनेक दिवसांपासून तापी नदीपात्रातील जळोद, पांझरा नदीपात्रातील मांडळ व अमळनेर शहराजवळील बोरी नदीपात्रातून अवैधपणे वाळू उत्खननाला उधान आलेले दिसत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : अमळनेर : तालुक्यातील बोरी, पांझरा व तापी या नदीपात्रांतून अनेक दिवसांपासून दिवसा व रात्री हजारो ब्रास वाळूचा अवैधपणे उपसा व वाहतूक सुरूच आहे. त्या माध्यमातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. मात्र, तरीही या अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांकडे स्थानिक महसूल प्रशासनाकडून कारवाई करण्याबाबत डोळेझाक करण्यात येत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून तापी नदीपात्रातील जळोद, पांझरा नदीपात्रातील मांडळ व अमळनेर शहराजवळील बोरी नदीपात्रातून अवैधपणे वाळू उत्खननाला उधान आलेले दिसत आहे. कोणालाही न जुमानता जेसीबी नदी पात्रात उतरवून वाळूमाफियांकडून डंपरने हजारो ब्रास वाळूची तस्करी करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

तरीदेखील संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे डोळेझाक केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाळूमाफियांचे चांगलेच फावत आहे. तापी नदी पात्रात या माफियांनी वाळूचे मोठ-मोठे ढीग करून ठेवलेले आहेत. सोबतच नदी पात्रात मोठ-मोठे खड्डेदेखील केलेले आहेत. जळोद-अमळगावमार्गे शेकडो ब्रास वाळूची अवैधपणे वाहतूक केली जात आहे.

विशेष म्हणजे वाळू वाहतूक करणारे राजरोसपणे डंपर व जेसीबीचा वापर करीत आहेत. गावखेड्यांमधून असलेल्या मुख्य रस्त्यावर डंपर भरधाव व सुसाट वेगात सुरू आहेत. वाळूतस्करी व अवजड वाहतुकीमुळे परिसरातील चांगल्या रस्त्यांची पुरती वाट लागत आहे.

तरीदेखील स्थानिक प्रशासनातील अधिकारी यांच्याकडून या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. शासनाच्या महसुलावर दरोडा टाकणाऱ्या या वाळूमाफियांना आता जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनीच तातडीने आवर घालावा, अशी मागणी केली जात आहे.

वाळूची चोरी रोखण्यासाठी स्वतंत्र पथके तयार केलेली आहेत. अनेकदा वाळू माफियांकडून महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ले केले गेलेले आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांनीदेखील महसूल प्रशासनाला मदत करणे अपेक्षित आहे. वाळूची चोरी रोखण्यासाठी यापुढेही प्रयत्न करणार आहोत.
- रुपेशकुमार सुराणा, तहसीलदार, अमळनेर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आता पती, वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक, काय आहे नवीन नियम

Fish Food: मत्स्यखाद्यासाठी ब्लॅक सोल्जर माशीच्या अळ्या

Agriculture Technology: यंत्रसामग्रीच्या व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

Orange Farmers: संत्रा बागांचे पंचनामे करा, नुकसान भरपाई द्या

Agriculture Success Story: युवा शेतकऱ्याची बहुविध फळबाग तंत्र पध्दतीची शेती

SCROLL FOR NEXT