4.93 lakh single women Marathwada : विभागातील एकल महिलांची अचूक संख्या निश्चित करण्यासाठी सर्व आठ जिल्ह्यांमध्ये सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व्हेक्षणात ४ लाख ९३ हजार ४५० एकल महिला आढळून आल्या आहेत. .मराठवाडा विभागात एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी विशेष उपक्रम सुरू केला आहे. नागरी भागातील एकल महिलांचे सविस्तर सर्व्हेक्षण करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. या सक्षमीकरण कार्यक्रमासाठी विभागीय महिला व बाल विकास उपायुक्त यांची विभागीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विभागातील एकल महिलांमध्ये विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता तसेच ४० वर्षांपुढील अविवाहित महिलांचा समावेश आहे. या महिलांचे प्रश्न गंभीर असून, प्रशासनाच्या माध्यमातून त्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्या संख्येचे अचूक आकलन व्हावे, यासाठी हे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. जिल्हा परिषदांमार्फत अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे..Single Women Survey: बुलडाणा जिल्ह्यात सर्व्हेक्षणात ८४,०७५ एकल महिलांची नोंद.विभागीय आयुक्तांनी घेतली बैठकसर्व्हेक्षणानंतर विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण), जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी तसेच नागरी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित केली. या बैठकीत एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवायच्या उपाययोजना तसेच कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस ‘साऊ एकल महिला समिती’चे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी उपस्थित होते. तसेच विभागीय महिला व बाल विकास उपायुक्त, अपर आयुक्त (महसूल) आणि अपर आयुक्त (विकास) यांचीही उपस्थिती होती..शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यावर भरबैठकीत एकल महिलांना आवश्यक असलेली कागदपत्रे जसे आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, आयुष्यमान कार्ड, तसेच इतर शासकीय सेवा ग्रामपंचायत स्तरावर तातडीने उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. या महिलांच्या मुला-मुलींसाठी असलेल्या बालसंगोपन योजनेत पात्र विद्यार्थ्यांचा समावेश करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत शाळांच्या मुख्याध्यापकांकडून अर्ज भरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या..Single Women Survey : राज्यात एकल महिला सर्वेक्षण करा.रोजगारक्षम महिलांना महिला बचत गटांमध्ये समाविष्ट करणे, प्रत्येक तालुक्यात उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यशाळा आयोजित करणे अशा उपक्रमांचाही प्रारंभी निर्णय घेण्यात आला आहे. विभागातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यांमध्ये एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी नावीन्यपूर्ण उपाययोजनांवर स्वतंत्र बैठका आयोजित कराव्यात, असे निर्देशही विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी दिले..सर्व्हेक्षणाच्या विश्लेषणानुसार संख्याविधवा महिला : ४ लाख ८४ हजार ६३७.घटस्फोटित महिला : १४ हजार ४६३,परित्यक्ता महिला : २१ हजार १४२४० वर्षांपुढील अविवाहित महिला : १६ हजार ६३७. वयोगटानुसार केलेल्या विश्लेषणातील संख्या१८ ते ३० वयोगटातील : ३२ हजार ९६६ महिला३१ ते ५० वयोगटातील : १ लाख ३९ हजार ७६२ महिला५१ ते ६५ वयोगटातील : १ लाख ६४ हजार ८१८ महिला६५ वर्षे व त्यापुढील ज्येष्ठ महिला : २ लाख ३ हजार ३८७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.