Illegal Sand Excavation : रेती माफियांना दणका ; खडकपूर्णा जलाशयात आठ बोटी केल्या नष्ट

Sand Mafia : देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणामध्ये रेतीचा अवैध उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेत महसूल व जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाने मोठी कारवाई करीत आठ बोटी नष्ट केल्या.
Illegal Sand Excavation
Illegal Sand ExcavationAgrowon
Published on
Updated on

Buldana News : देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणामध्ये रेतीचा अवैध उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेत महसूल व जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाने मोठी कारवाई करीत आठ बोटी नष्ट केल्या. अवैध उपसा करणाऱ्यावर नियमितपणे कारवाई करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी संबधिताना दिले.

खडकपूर्णा धरणाच्या जलाशयामध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेण्यासाठी महसूल विभाग व जिल्हा स्तरीय शोध व बचाव पथकाव्दारे मोहीम राबविण्यात येत आहे. मौजे गारखेड व मंडपगाव जवळील शिवारात अवैध रेती उपसा करणाऱ्या चार फायबर बोटी व चार इंजिन बोटी अशा एकूण आठ बोटी पकडण्यात आल्या.

Illegal Sand Excavation
Sand Storage : छत्रपती संभाजीनगरच्या ५ डेपोंमध्ये ६१ हजार ब्रास वाळूचा साठा

त्यामधील मजूर पळून गेल्याने बोटी कोणाच्या आहेत, याची माहिती मिळू शकली नाही. सदर आठ बोटी धरणाच्या किनाऱ्यावर स्फोटके लावून नष्ट करण्यात आल्या. सदर शोध मोहीम राबविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

Illegal Sand Excavation
Free Sand Scheme : घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत देणार

बोटी बेशरमाच्या झाडीमध्ये लपविण्यात आल्या होत्या. बोटी नष्ट करण्याची प्रक्रिया रात्री आठ वाजेपर्यंत राबविण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

यावेळी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार प्रवीण घोटकर, सायली जाधव, मंडळ अधिकारी विजय हिरवे, काशिनाथ ईप्पर, रामदास मांटे, प्रल्हाद केदार, विलास नागरे, परमेश्वर बुरकुल, संजय हंडे, सुरेश डोईफोडे, मधुकर उदार, संजय बरांडे, राजू तागवाले, आकाश खरात, तेजस शेटे, कृष्णा खरात, एस. जे. तल्हार, सहाय्यक पोलिस निरीक्षक तरासिंग पवार, गुलाबसिंग राजपूत, संदीप पाटील, सलीम बरडे, प्रदीप सोनुने, नारायण गीते आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com