Sand Excavation
Maharashtra Sand Policy Agrowon

Illegal Sand Mining : बेफाम वाळूउपशाने नदीकाठी टंचाई

Sand Mafia : गिरणा पट्ट्यासह ग्रामीण भागात नदीतून माती, वाळू यासारख्या गौणखनिजाची खुलेआमपणे वाहतूक केली जात असून, महसूल प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
Published on

Jalgaon News : गिरणा पट्ट्यासह ग्रामीण भागात नदीतून माती, वाळू यासारख्या गौणखनिजाची खुलेआमपणे वाहतूक केली जात असून, महसूल प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. ही समस्या वाढत असून, नदीकाठीदेखील टंचाई तयार होते. पर्यावरणविषयक नियमांचे पालन केले जाते की नाही, असा प्रश्‍नही ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

गौणखनिजाची चोरट्या मार्गाने वाहतूक करणारे माफिया आणि त्यांचे दलाल मोकाट सुटले आहे. रात्रंदिवस वाळू, मातीची चोरी गिरणा, सुकी, तापी आदी नद्यांतून सुरू आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून गौणखनिज चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Sand Excavation
Maharashtra Sand Policy: फार्स नव्या धोरणाचा!

कारण नदीत पाणी मुरत नाही. ते वाहून जाते. नदीत वाळू शिल्लक नाही. नद्यांना ओरबडण्यात आले आहे. यामुळे नदीत पाणी असूनही नदीकाठच्या शिवारातील विहिरी, कूपनलिकांना हवे तसे जलस्रोत नाही, कूपनलिका एप्रिलमध्येच नदीकाठी आटू लागतात, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गौणखनिजाची वाहतूक केली जात असतानाही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. माती, वाळूची दिवसभर वाहतूक केली जात असताना, त्यास पायबंद घालण्यात महसूल प्रशासन असमर्थ ठरले आहे. जळगाव, एरंडोल, धरणगाव, भडगाव, पाचोरा, चाळीसगावसह अमळनेर, पारोळा, यावल, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर आदी भागांत ही समस्या आहे.

Sand Excavation
Jalna Sand Auction : जालना जिल्ह्यातील अठ्ठावीस वाळू घाटांच्या लिलावाची लगीनघाई

अधिकाऱ्यांवरही हल्ले

धरणगाव, एरंडोल, जळगाव, यावल भागात महसूल कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला होता. प्रशासनातील कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यानंतर वाळू वाहतूक बंद होईल, असा विश्‍वास होता. मात्र माती, वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक सुरूच आहे. स्थानिक तलाठी कोणतीही कारवाई यावर करीत नाहीत.

गिरणा नदीतून अनेक गावांत मागील ३० ते ३२ वर्षे वाळू उपसा बेफाम सुरू आहे. नदीत २० ते ३० फुटाचे खोल खड्डे आहेत. वाळूच काही गावांनजीक नदीत शिल्लक नाही. यामुळे नदीत पाणी थांबून ते जिरत नाही. ते गतीने वाहून जाते. यामुळे नदीकाठच्या गावांत व शिवारात टंचाई असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com