Illegal Seed Sale Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal HTBT Seed : बेकायदा एचटीबीटी कापूस बियाणे विक्री करणाऱ्यावर गुन्हा

HTBT Cotton Seed : कृषी विभागाने बुधवारी (ता.११) केलेल्या कारवाईत जळगाव जामोद येथील आचल नगर परिसरात बेकायदा एचटीबीटी कापूस बियाण्याची विक्री करताना एकास पकडले आहे.

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या कापूस उत्पादक पट्ट्यात यंदा एचटीबीटीची मोठी विक्री होत आहे. कृषी विभागाने बुधवारी (ता.११) केलेल्या कारवाईत जळगाव जामोद येथील आचल नगर परिसरात बेकायदा एचटीबीटी कापूस बियाण्याची विक्री करताना एकास पकडले आहे. त्याच्याविरुद्ध जळगाव जामोद पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक गणेश सावंत यांना मिळालेल्या माहिती आधारे कारवाई करण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांच्या मार्गदर्शनात सापळा रचून पथकाने ५९ पाकिटे जप्त केली आहे.

याबाबत कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद येथे आचल नगर भागात राहणाऱ्या अशोक रामभाऊ रंदाळे (वय ३९) हा व्यक्ती अनधिकृत बियाण्यांची विक्री करताना आढळून आला.

त्याच्याकडे बियाणे विक्रीचा कुठलाही परवाना नाही. त्याने हे बियाणे सुनगाव (ता. जळगाव जामोद) येथील एका कृषी केंद्रातून आणल्याचे सांगितले. अशोक रंदाळे याच्या घरात झडती घेतली असता एकूण ५९ अनधिकृत बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली. या पाकिटांवर उत्पादक, विक्रेता अशी काहीही माहिती नव्हती.

या प्रकरणात अशोक रंदाळे यांच्याविरुद्ध बीएनस २०२३, बियाणे नियम १९६८, बीज अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, तसेच वजन व मापे नियम १९७७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तसेच महाराष्ट्र कापूस बियाणे २००९ व कापूस बियाणे किंमत नियंत्रण आदेश २०१५ चे कलमेदेखील लागू करण्यात आले आहेत.जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा बियाणे निरीक्षक गणेश सावंत, खामगाव तालुका कृषी अधिकारी संजय पवार, धनंजय देवकर, प्रमोद गायके, जळगाव रमेश जाधव, कृष्णा भगत या पथकाने केली.

कृषी केंद्राची झाडाझडती

एचटीबीटी प्रकरणात आरोपीने संबंधित बियाणे सुनगाव येथील कृषी केंद्रातून आणल्याचे तपासादरम्यान सांगितले. त्यानंतर कृषी विभागाच्या पथकाने संबंधित कृषी केंद्राची झाडाझडती घेतली. मात्र, तेथे पथकाला काहीही आढळून आले नाही. कदाचित जळगाव येथील कारवाईची माहिती संबंधितांपर्यंत तातडीने पोचल्याने संबंधित कृषी विक्रेत्याने बियाण्याची विल्हेवाट लावल्याचा संशय अधिकाऱ्यांनी बोलून दाखवला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT