Illegal Seed Sale: अमरावतीत ‘एचटीबीटी’ने गुंडाळला ‘बीजी दोन’चा बाजार

Amravati BG II Seeds: अमरावती जिल्ह्यात कपाशीच्या तणनाशक सहनशील बीटी बियाण्यांच्या (HTBT) बेकायदेशीर विक्रीमुळे पारंपरिक 'बीजी दोन' (BG II) वाणाच्या बियाण्यांच्या बाजाराला मोठा फटका बसला आहे.
HTBT Seed
HTBT Seed Agrowon
Published on
Updated on

Amravati News: कपाशीच्या तणनाशक सहनशील बीटी बियाण्याच्या (एचटीबीटी) प्रवेशाने कापसाच्या ‘बीजी दोन’ या वाणाच्या रिसर्च व्हरायटीचाही बाजार उठल्यात जमा झाला आहे. दरवर्षी जवळपास १५ लाख पाकिटांची होणारी उलाढाल यंदा थांबली असून, १५ मेपासून आतापर्यंत पूर्ण बाजारात १०० पाकिटे ही विकल्या गेली नसल्याचे कृषी केंद्र संचालकांनी सांगितले.

यंदाच्या खरिपात जिल्ह्यात २ लाख ४९ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड अंदाजित करण्यात आली आहे. त्यासाठी १२ लाख ४७ हजार ५०० बीजी दोन या वाणाच्या पाकिटांची मागणी कृषी विभागाने केली आहे. त्यांना शेतकऱ्यांकडून मागणी नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

HTBT Seed
HTBT Seed : सतरा लाखांचे अवैध एचटीबीटी बियाणे जप्त

यंदाच्या खरीप हंगामात गुजरातमधून जिल्ह्यात प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांचा मोठ्या प्रमाणावर तस्करीने पुरवठा झाला आहे. महिनाभरात कृषी विभागाच्या पथकाने ४३.८२ लाख रुपयांची ४ हजार २८६ पाकिटे एचटीबीटी बियाणे जप्त केले आहे. तथापि, जिल्ह्यात एकूण मागणीच्या ८५ टक्के साठा एचटीबीटी बियाणे उपलब्ध झाला असल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास सर्वच शेतकऱ्यांपर्यंत हे बियाणे पोहोचले असल्याचा अंदाज शिवणगाव येथील शेतकरी गजानन खरबडे यांनी वर्तविला.

HTBT Seed
HTBT Cotton Issue: ‘एचटीबीटी’चा तिढा सोडवा

त्याचा एकूणच परिणाम दरवर्षी मागणी असलेल्या बीजी दोन वाणाच्या बियाण्यांच्या विक्रीवर पडून ती यंदा ठप्प झाली आहे. १५ मेपासून आतापर्यंत दहा पाकिटे विकल्या गेल्याचे सतीश अॅग्रो सेंटरचे संचालक चेतन सोनी यांनी सांगितले. तथापि, नामांकित कंपन्यांच्या बियाण्यांना मागणी असून ही त्या बियाण्यांचा सध्या तुटवडा असल्याचेही ते म्हणाले.

दामदुप्पट भावाने विक्री

‘बीजी दोन’ बियाण्यांची किंमत प्रति पाकिट ९०१ रुपये आहे. त्या तुलनेत एचटीबीटीची एका पाकिटाची किंमत १४०० ते १५०० रुपये आहे. तस्करांना या बियाण्यांच्या विक्रीत नफा अधिक असल्याने रिस्क घेऊन विक्री सुरू आहे. नियंत्रणासाठी यंत्रणा कमी पडत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com