Tree Cutting  Agrowon
ॲग्रो विशेष

Forest Department : सार्वजनिक बांधावरील निंबाच्या झाडांची बेसुमार कत्तल

Tree Cuttings : गालापूर शिवारातील गट क्रमांक १५१/१मधील गटात रमेश कंखरे, रवींद्र कंखरे, सागर कंखरे यांची शेती आहे. त्यांच्या शेताच्या बांधावरील जीवंत निंब वृक्षांची अज्ञात व्यक्तींकडून कत्तल करण्यात आली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : तालुक्यातील गालापूर येथील शेताच्या सार्वजनिक बांधावरील हिरव्यागार निंबाच्या वृक्षांची बिनधास्तपणे कत्तल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खुलेआमपणे अशाप्रकारे जीवंत वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड केली जात असतानादेखील वनविभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. म्हणून याबाबत वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेऊन वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

गालापूर शिवारातील गट क्रमांक १५१/१मधील गटात रमेश कंखरे, रवींद्र कंखरे, सागर कंखरे यांची शेती आहे. त्यांच्या शेताच्या बांधावरील जीवंत निंब वृक्षांची अज्ञात व्यक्तींकडून कत्तल करण्यात आली आहे. सदरचे निंबाची झाडे सुमारे पन्नास वर्षांपूर्वीचे होती.

या जीवंत वृक्षांची तोड होत असताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून वृक्षतोड करणाऱ्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. जीवंत वृक्षांची तोड सुरू असताना तालुक्यातील निपाणे येथील दोन व्यक्तींनी आम्हाला हे वृक्ष तोडण्यास सांगितले असल्याचे सांगितले.

या वेळी उपस्थित रमेश कंखरे, सागर कंखरे, माजी सरपंच रवींद्र कंखरे यांच्यासह शेतकऱ्यांनी वृक्षतोडीस विरोध केला. मात्र, झाडांची कत्तल करणाऱ्यांनी त्यांना धमकावून तोड सुरूच ठेवली.

रात्री वाहनांतून लाकडांची वाहतूक!

शहरासह ग्रामीण भागात जीवंत वृक्षांची बिनधास्तपणे तोड सुरू आहे. विशेष म्हणजे विटभट्टी व उपाहारगृह येथेही जीवंत वृक्षांच्या लाकडांचा सरपण म्हणून वापर केला जात आहे. विविध वखारींवरदेखील रोज रात्री वाहनांमधून वृक्षतोड केलेली लाकडे आणली जात असतात.

शासन वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करण्यासाठी दरवर्षी करोडो रुपये खर्च करीत असून, ज्यांच्यावर वृक्षांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे, असे वन विभागाचे अधिकारीच वृक्षतोड करणाऱ्यांना पाठीशी घालीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेताच्या बांधावरील जीवंत वृक्षांची तोड करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT