Sand Excavation Agrowon
ॲग्रो विशेष

Sand Excavation : गिरणा-मोसमचा बेकायदेशीर वाळू उपसा थांबता थांबेना

Illegal Sand : वाळू वाहून नेणारे चोरटे रस्ते तहसीलदारांनी जेसीबीच्या साहाय्याने खोदले तरी वाळू माफियांनी पर्यायी रस्ते शोधून काढले आहेत.

मुकूंद पिंगळे

Sangli News : तालुक्यातील गिरणा व मोसम या दोन प्रमुख नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरूच आहे. वाळू वाहून नेणारे चोरटे रस्ते तहसीलदारांनी जेसीबीच्या साहाय्याने खोदले तरी वाळू माफियांनी पर्यायी रस्ते शोधून काढले आहेत. बैलगाडीतून वाळू वाहतुकीचा फंडा येथे राजरोसपणे सुरू आहे.

तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी वाळू वाहून नेणाऱ्या दोन बैलगाड्या जप्त केल्या. तालुक्यातील विविध नद्यांमधील वाळू उपसा थांबता थांबत नसल्याने महसूल व पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

गिरणा नदी पात्रातून चिंचावड, आघार, दाभाडी व सवंदगाव शिवारातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे वाळू उपसा केला जात आहे. तर मोसम नदी पात्रातून वळवाडी, वडनेर, अजंग, काष्टी आदी शिवारातून वाळू उपसा होत आहे. दोन महिन्यापुर्वी तहसीलदारांनी वाळू वाहून नेणारे चोरटे रस्ते जेसीबीच्या साहाय्याने खोदले होते.

तसेच वाळू उपश्‍याला आळा घालण्यासाठी भरारी पथक नियुक्त करण्यात आले होते. यानंतर आठ-दहा दिवस या प्रकारांना आळा बसला. वाळू वाहतूक करणाऱ्यांनी पर्यायी रस्ता शोधून काढला आहे. ट्रॅक्टर व बैलगाडीतून वाळू वाहतूक केली जात आहे. ट्रॅक्टरमधून मध्यरात्रीनंतर वाळू वाहतूक होते.

मोसम व गिरणा या दोन्ही नदी पात्रांमध्ये वाळू वाहतुकीमुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. सध्या रात्री ट्रॅक्टरमधून तर दिवसा बैलगाडीतून वाळू वाहून नेली जाते. गिरणा नदी पात्रातून दाेन बैलगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. वाळू उपशामुळे नदीकाठच्या विहिरींमधील जलसाठा देखील कमी होत आहे. महसूल व पोलिस प्रशासनाने याबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT