Fertilizer  Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Fertilizer Sale : नाशिकमध्ये संशयित जैविक खतांचा साठा जप्त

Fertilizer Black Market : नाशिक विभागात बोगस व विक्री परवाना नसताना कापूस बियाणे विक्रीचे प्रकार समोर आले आहेत. अशातच संशयित जैविक खतांचा साठा जप्त केला आहे.

Team Agrowon

Nashik News : गुणनियंत्रण विभागाच्या पथकाने प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथील वेस्टीज मार्केटिंग प्रा. लि. या कंपनीच्या आऊटलेटमध्ये शेतकऱ्यांना विक्री हेतू विनापरवाना कॅरीयर बेस कॉन्सरशिया, फॉस्फेट सोल्युबिलायझिंग फंगल बॅक्टेरिया हे जैविक संशयित खत मिळून आले.

खत विक्रीचा परवाना नसल्याने नोटीस बजावली होती. मात्र खुलासा न केल्याने संबंधिताविरोधात खत नियंत्रण आदेश १९८५ अन्वये इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक विभागात बोगस व विक्री परवाना नसताना कापूस बियाणे विक्रीचे प्रकार समोर आले आहेत. अशातच संशयित जैविक खतांचा साठा जप्त केला आहे.

या जैविक खताचा वेस्टीज मार्केटिंग प्रा. लि. (शॉप नं.१०४ अटलांटा शॉपर्स, पाथर्डी फाटा, नाशिक) यांच्याकडे खत विक्रीचा परवाना नसल्याने संबंधितांना २२ मे रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

मात्र खत उत्पादक असलेल्या ऑलवीन इंडस्ट्रीज प्रा. लि. (प्लॉट नं. १७४ सेक्टर नं.१, इंडस्ट्रियल एरीया, पिथमपुर, धार, मध्य प्रदेश) तसेच विपणनकर्ता वेस्टीज मार्केटिंग प्रा. लि. (ए ८९, ओखला इंडस्ट्रीयल एरीया फेज- 2, नवी दिल्ली) यांसह विक्रेत्यांकडून खुलासा सादर करण्यात आलेला नाही.

यासंबंधी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डॉ. जगन सूर्यवंशी यांनी उत्पादक मऑलवीन इंडस्ट्रीज, विक्रेत्या रूपाली सुशील खिंवसरा आणि लियाकत अली खाटीक यांच्या विरोधात खत नियंत्रण आदेश १९८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडे ३,०५० ग्रॅम वजनाचा ११ हजार ९१५ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांच्या मागदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डॉ. जगन सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.

यासंबंधी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी शासकीय पंच म्हणून नाशिक पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल अहिरे, नाशिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे कृषी अधिकारी सुरेश डगळे, जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी दीपक सोमवंशी यांनी काम पाहिले. तर पोलीस कॉन्स्टेबल वैशाली पवार व सुखदेव अहिरे यांनी सहकार्य केले. पोलिस उपनिरीक्षक युवराज शिरसाठ तपास करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uttarakhand Flash Flood: पंतप्रधान आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार

Pomegranate Farming : गुणवत्तापूर्ण डाळिंबाला चांगली मागणी

Dragon Fruit Farming : ऊस पट्ट्यात ड्रॅगन फ्रूट लागवडीतील प्रयोग

Cotton Farming: योग्य व्यवस्थापनामुळे कोरडवाहू क्षेत्रातूनही उत्तम उत्पादन

Citrus Farming: संत्रा, मोसंबीसाठी सिलिकॉन फायदेशीर

SCROLL FOR NEXT