Unauthorized Fertilizer Sale : मध्य प्रदेशातील कंपनीविरुद्ध कृषी विभागाची कारवाई

Illegal Fertilizer : अधिक चौकशीत, भोकरदन रोडवर असलेल्या गुंडेवाडी शिवारात कंपनीने भाडेतत्त्वावर घेतलेल्या एका गोदामात या खतांचा साठा केला असल्याचे निदर्शनास आले.
Fertilizer
Fertilizer Agrowon
Published on
Updated on

Jalna News : डीनोटीफाईड ग्रेडचे खत विनापरवाना विक्री व प्रथमदर्शनी दिशाभूल करून शासनाचा कर चुकविण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्याने कृषी विभागाने मंगळवारी (ता. २७) मध्य प्रदेशातील कृष्णा फॉस्केम लिमिटेड कंपनीसह जबाबदार व्यक्ती इंद्रराजसिंग यांच्याविरुद्ध सविस्तर माहिती घेऊन तक्रार दिली. त्यावरून चंदनझिरा पोलिसांनी विवीध कलमान्वये गुन्हे दाखल केला आहे.

अधिक माहितीनुसार, की रविवारी (ता. २५) रेल्वे रेक पॉइंट रेल्वे स्टेशन जालना येथे कृष्णा फॉस्केम लिमिटेड कंपनीचे विविध खते ट्रकद्वारे उतरून घेत असल्याचे आढळून आले. यातील फॉस्फोजिप्सम पावडर नावाचे खत विनापरवाना असल्याचा संशय आला. अधिक चौकशीत, भोकरदन रोडवर असलेल्या गुंडेवाडी शिवारात कंपनीने भाडेतत्त्वावर घेतलेल्या एका गोदामात या खतांचा साठा केला असल्याचे निदर्शनास आले.

Fertilizer
Illegal Fertilizer Sale : अनधिकृत खते विकणारे दोघे पोलिसाच्या ताब्यात

सविस्तर चौकशी केली असता फॉस्फोजिप्सम पावडर नावाचे खत कंपनीने विनापरवाना आणले असल्याची बाब उघडकीस आली. शिवाय दिशाभूल करून शासनाचा कर चुकविण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक चौकशीतून पुढे आले. त्यानंतर खताचे नमुने खत प्रयोगशाळा छत्रपती संभाजीनगर येथे तपासणीसाठी पाठविले.

कृषी विभागाकडून जालन्याचे खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी विशाल गायकवाड यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून मंगळवारी (ता. २७) रात्री उशिरा मध्य प्रदेशातील कृष्णा फॉस्केम लिमिटेड कंपनीसह इंद्रराजसिंग यांच्याविरुद्ध विनापरवाना खत विक्री, बिलामध्ये चुकीचा एचएसएन कोड व चुकीचे प्रोडक्ट नेम, खत नियंत्रण आदेश उल्लंघन, अत्यावश्यक वस्तू कायदा तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४) चा भंग केल्याप्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Fertilizer
Illegal Fertilizer : अनधिकृत रासायनिक खताचा साठा जप्त

त्यावरुन चंदनझिरा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्र अधिकारी गुणनियंत्रण आशिष काळूशे, जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य) विशाल गायकवाड, मोहीम अधिकारी नीलेशकुमार भदाणे यांच्या संयुक्त पथकाने केली.

रेल्वे रेकद्वारे आलेल्या फॉस्फोजीप्सम खताचा कृष्णा फॉस्केम लिमिटेड कंपनीकडे परवाना नसने व ते डीनोटिफाइड ग्रेडचे असल्याचे निष्पन्न होताच संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकऱ्यांनी, अधिकृत विक्रेता यांच्याकडूनच बियाणे व खताची खरेदी करावी. खरेदी करताना काही संशय आल्यास कृषी विभागाशी त्वरित संपर्क साधावा.
-पी. बी. बनसावडे, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद जालना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com