Pratap Chiplunkar Agrowon
ॲग्रो विशेष

Pratap Chiplunkar : ॲग्रोवननं शिकवलं वाचाल तर वाचाल !

Article by Pratap Chiplunkar : ॲग्रोवनमधून सातत्याने लेखन चालू असते. ते वाचून अनेक मासिकांकडून आणि दिवाळी अंकांकडून लिखाणासाठी विचारणा होऊ लागली. अनेक व्हॉट्सॲप गटांवर कधी परवानगी घेऊन तर कधी विनापरवानगी माझे लेख टाकले जातात.

Team Agrowon

ॲग्रोवनमधून सातत्याने लेखन चालू असते. ते वाचून अनेक मासिकांकडून आणि दिवाळी अंकांकडून लिखाणासाठी विचारणा होऊ लागली. अनेक व्हॉट्सॲप गटांवर कधी परवानगी घेऊन तर कधी विनापरवानगी माझे लेख टाकले जातात. मासिकांचे कार्यक्षेत्र मर्यादित असते. परंतु ॲग्रोवनचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे.

मासिकातील लेखनावर फार क्वचित प्रतिक्रिया येतात. मात्र ॲग्रोवनमध्ये लेख प्रसिद्ध झाला की सर्व महाराष्ट्रातून दिवसभर फोन सुरू असतात. असाच एकेदिवशी लेख प्रसिद्ध झाला. मी एका कार्यक्रमात होतो. परंतु तिथे त्या लेखावर प्रतिक्रिया देण्यासाठी सारखे फोन सुरू झाले. एका दिवसात १४८ फोन आले. मला कार्यक्रमातील एकाही प्रसंगात सहभागी होता आले नाही. संपूर्ण दिवस कानाला भ्रमणध्वनी होता. या दैनिकाच्या माध्यमातून आपण विस्तृत क्षेत्रावर एकाच वेळी पोहोचू शकतो.

मी भू-सूक्ष्मजीवशास्त्राचा विद्यार्थी आहे. या शास्त्राने मला खूप नवनवीन गोष्टी शिकवल्या. या गोष्टी शेतकऱ्याला दैनंदिन कामात इतर कोणत्याही विद्याशाखेपेक्षा जास्त मदत करतात. असे असताना हे शास्त्र आजही अंधारात आहे. हे शास्त्र सर्व इंग्रजीत आहे. समजून घेण्यासाठी खूप अवघड आहे. या विषयाची जी पुस्तके उपलब्ध आहेत, ती सर्व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत; शेतकऱ्यांसाठी नाहीत. एखादे ५००-६०० पानांचे पुस्तक वाचावे, त्या वेळी दोन-चार सुताचे धागे सापडतात. ॲग्रोवनसारखे माध्यम मिळाल्यामुळे मला या विषयातील ज्ञानाचे कण मराठीतून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविता आले.

शेतीमध्ये काही मूलभूत विषय असे असतात, की ते सगळ्या पिकांना लागू पडतात. असे लिखाण मला भू-सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासामुळे करता आले. लेखनासाठी या दैनिकाकडून सातत्याने प्रोत्साहन मिळत गेले. शेतीविषयक लेखन करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने प्राध्यापक, शास्त्रज्ञ, विस्तार कार्यकर्ते, राज्य व केंद्र सरकारच्या शेती खात्यांतील मंडळी, उद्योजक, व्यापारी यांचा समावेश असतो. पण या ठिकाणी शेतकऱ्यांनी हातामध्ये लेखणी धरणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांचे खरे प्रश्‍न शेतकरीच मांडू शकतात. अनेकांकडे माहितीचा खजिना असतो. परंतु लेखनाची आवड नसते. प्रयत्न केल्यास आपणही लेखक बनू शकता. सरुवातीला काही काळ त्यासाठी उमेदवारी करावी लागेल. परंतु लेखक बनणे तसे अवघड नाही. आपले अनुभव अनेकांच्या समस्या सोडवू शकतात. शेतीत हे सर्वांत महत्त्वाचे व गरजेचे आहे. माहितीची, अनुभवाची, ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म अत्यंत उपयुक्त आहे. वाचाल तर वाचाल!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate: सदनिका गैरव्यवहार प्रकरण भोवले, माणिकराव कोकाटे यांच्याकडील खाती काढली, आता बिनखात्याचे मंत्री

Muncipal Election: ‘झेडपी’, पंचायत समितीत अपिलाची तरतूद काढली

Cotton Rate: कापूस दर दबावातच

Jaggery Production: कोल्हापुरी गुळाला कर्नाटक, गुजरातच्या गुळाचेच आव्हान

Moneylender Exploitation Issue: शेतकऱ्यांविषयीच्या संवेदना हरपल्या

SCROLL FOR NEXT