Pratap Chiplunkar : एका शेतकऱ्याने विनानांगरणीची शेती का स्वीकारली ?

Article by Pratap Chiplunkar : ‘८ फेब्रुवारी २००८ रोजी नवी दिल्ली येथे जागतिक पातळीवरची सहा दिवसांची परिषद भरणार असून, तिचा विषय विनानांगरणीची शेती असा आहे.
Pratap Chiplunkar
Pratap ChiplunkarAgrowon

‘८ फेब्रुवारी २००८ रोजी नवी दिल्ली येथे जागतिक पातळीवरची सहा दिवसांची परिषद भरणार असून, तिचा विषय विनानांगरणीची शेती असा आहे,’ अशी बातमी २००७ च्या फेब्रुवारी महिन्यात म्हणजे पूर्ण एक वर्ष अगोदर ॲग्रोवनमधून प्रसिद्ध झाली. मी २००५ पासून मशागत बंद करून विनानांगरणीची शेती चालू केली होती.

त्या काळात विनानांगरणी अगर मशागत न करता शेती करणे शक्य आहे, याची माहिती कोणाला नव्हती. परिस्थितीच्या रेट्यामुळे मी ते तंत्र स्वीकारले. तो एक प्रयोग होता. यातील यश-अपयश हे सुद्धा या प्रयोगाच्या शेवटी कळणार होते. भात आणि ऊस ही दोन्ही पिके या तंत्राने उत्तम आली. वरील बातमीमुळे अशी विनानांगरणीची शेती जगभर अनेक देशांत केली जाते, याची माहिती समजली.

आपण फार काही जगावेगळे करत नाही आहोत; हे तंत्र जगभर वापरले जाते, अनेक देशांत यावर संशोधन चालते, दर तीन वर्षांनी या तंत्रात काम करणारे शास्त्रज्ञ एकत्र येतात व झालेल्या कामाचा आढावा घेऊन पुढील तीन वर्षांचे नियोजन केले जाते, हे मला कळाले.

Pratap Chiplunkar
Pratap Chiplunkar : पिकांनाही सहजीवनाचा आनंद घेऊ द्या

यथावकाश ही परिषद पार पडली. परिषदेत सादर झालेले शोधनिबंध वाचण्याची माझी इच्छा होती. दरम्यान, परिषदेचे मुख्य उद्‍घाटक उद्‍घाटन करून मुंबईमार्गे आपल्या गावी गेले. त्यांची ॲग्रोवनने मुलाखत घेतली. त्यांचे म्हणणे असे, की विनानांगरणीची शेती ही काळाची गरज आहे,

परंतु आमच्या राज्यातील जमीन इतकी कडक आहे, की नांगरल्याशिवाय पिकांची पेरणीच करता येणार नाही. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांचे काही शास्त्रज्ञ परिषदेला जाऊन आले. त्यांच्याही मुलाखती ॲग्रोवनने प्रसिद्ध केल्या. त्यांचे म्हणणे पडले, की खरीप पिकांची कापणी व रब्बीची पेरणी यामध्ये पंजाब, हरियानातील भात-गहू पीकपद्धतीमुळे वेळ अतिशय कमी मिळतो.

Pratap Chiplunkar
Pratap Pawar : कौरव...पांडव आणि सदसद्‌विवेक...!

मशागत करून पेरणी करण्यात गव्हाची पेरणी उशिरा होते. म्हणून तेथे विनानांगरणीची शेती करणे गरजेचे आहे. आपल्याकडे खरीप कापणीनंतर रब्बी पिकांच्या पेरण्यांसाठी एक ते दीड महिना मिळत असल्याने आपण आरामात मशागत करूनच शेती करणे चांगले. इकडे मी तीन वर्षांपासून यशस्वीपणे विनानांगरणीची शेती करत होतो.

त्यामुळे तज्ज्ञांची प्रतिक्रिया वाचून आश्‍चर्य वाटले. यथावकाश परिषदेत झालेल्या चर्चेवर आधारित सर्व प्रकाशने सहा महिने पाठपुरावा करून हस्तगत केली. एकूण ११०० पानांच्या या दस्ताऐवजाचा पूर्ण अभ्यास केला.

मी विनानांगरणीची शेती का स्वीकारली आणि जगभरात ती का स्वीकारली गेली याचा कोठे ताळमेळ जमतो का, याचा मी त्यातून शोध घेतला. हा अभ्यास पूर्ण झाल्यावर प्रत्येक आठवड्याला एक संपूर्ण पान याप्रमाणे एकूण ३७ भागांत माझी दुसरी लेखमाला ॲग्रोवनने प्रसिद्ध केली. ‘सकाळ प्रकाशना’ने त्याचे पुढे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तकही शेतकरीप्रिय झाले.

(संपुर्ण लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात )

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com