Pratap Chiplunkar : शेतकऱ्याच्या पुस्तकाच्या नऊ आवृत्त्या कशा निघाल्या?

Article by Pratap Chiplunkar : उपसंपादकांनी मला एकदम आवाहन केले, की प्रत्येक आठवड्याला अर्धे पान मी तुम्हाला देत आहे; तुम्हीच जमिनीच्या सुपीकतेसंबंधी लिहावे.
Pratap Chiplunkar
Pratap ChiplunkarAgrowon
Published on
Updated on

Pratap Chiplunkar :

असाच एक दिवस मी कार्यालयात गेलो असता तिथे उपसंपादकांची भेट घेतली. तेथे आणखी काही मंडळी होती. जमिनीच्या सुपीकतेबद्दल प्राथमिक चर्चा चालू होती. उपसंपादकांनी मला एकदम आवाहन केले, की प्रत्येक आठवड्याला अर्धे पान मी तुम्हाला देत आहे; तुम्हीच जमिनीच्या सुपीकतेसंबंधी लिहावे.

पूर्ण एक वर्ष एकूण ५२ भाग लेखन करावे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मी कावराबावरा झालो. एकरी २०-२५ गाड्या शेणखत शेवटच्या कुळवाच्या पाळीआधी देऊन मातीत मिसळले की पूर्वमशागत व जमिनीची सुपीकता एकाच वाक्यात संपून जाई. अशा परिस्थितीत माझ्यासारख्या नवलेखकाने ५२ भाग या विषयावर कसे लिहावे? मी उपसंपादकांना विचार करण्यासाठी काही वेळ मागितला.

Pratap Chiplunkar
Indian Agriculture : शोध नदीकाठी हरवलेल्या दोन भावंडांचा

बरेच चिंतन केल्यावर त्यांना कळवले की ५२ भाग लेखन करणे अवघड आहे, तरीही शक्य तेवढे जास्तीत जास्त लेखन करण्याचा प्रयत्न करून पाहतो, अधेमध्ये विषय संपल्यास मालिका थांबवावी लागेल. त्याला उपसंपादकांनी सहमती दिली व लेखन चालू करण्यास सांगितले. कधी तरी महिना-दोन महिन्यांत एखादा लेख लिहिणारा मी प्रत्येक आठवड्याला एक लेख या आव्हानाला सामोरे जाण्याचे ठरवून कामाला लागलो. तशी लेखमाला लिहिणे हा माझ्यासाठी नवीनच प्रयत्न होता.

धाडस करून लेख लिहीत गेलो. जसजसे लेखन करू लागलो, तससे नवीन विषय सुचत गेले. मालिका लोकप्रिय झाली असावी. त्या काळी आजच्यासारखे दूरध्वनी किंवा मोबाइल नव्हते. वाचकांकडून पत्राद्वारे भरपूर प्रतिक्रिया येत व अनेकांना उलट टपालाद्वारे उत्तरे द्यावी लागत. पाहता पाहता ५२ भाग झाले. मी उपसंपादकांना सांगितले, की आपल्या अपेक्षेप्रमाणे ५२ भाग झाले आहेत; परंतु अजून बराच भाग सांगायचा शिल्लक राहिला आहे, असे वाटते.

मालिका थांबवायची का पुढे चालू ठेवायची? ‘‘तुम्हाला जितके लिहिता येईल, तितका काळ लिहीत राहा, थांबण्याची काही गरज नाही,’’ असा निरोप आला. पुढे मजल दरमजल करत ८० भागांत ती मालिका संपवली. ५२ भाग पुरे करता येतील का, या शंकेने ग्रासलेल्या मला ८० भागांपर्यंत जाता आले, हे आजही स्वप्नवत वाटते.

Pratap Chiplunkar
Indian Agriculture : शेती फायदेशीर करणारी स्लरी!

पुढे यथावकाश या लेखांचे संकलन करून ‘सकाळ प्रकाशना’ने त्याचे पुस्तक प्रकाशित केले. पुण्याच्या सकाळ कार्यालयाच्या प्रवेशद्वारातील काचेच्या कपाटात इतर अनेक प्रथितयश लेखकांच्या पुस्तकांच्या पंगतीत आपले पुस्तक पाहणे हा एक सुखद अनुभव होता. प्रथम आवृत्ती २०११ मध्ये प्रकाशित झाली. २०२२ पर्यंत त्याच्या नऊ आवृत्त्या निघाल्या. आज बारा वर्षांनंतरही त्याच्या खपाचा आलेख चढाच आहे.

या लेखमालेने माझ्यातला लेखक घडवला. वर्तमानपत्रातील लेख वेगवेगळ्या विषयांवरील आणि तुटक तुटक असतात. तर पुस्तकातून एकसंघ संपूर्ण विषय अभ्यासता येतो. असे असले तरी मी थेट पुस्तक लिहिण्यास हातात घेतले असते, तर ते पूर्णत्वाला गेले असते की नाही हे सांगता येत नाही. प्रत्येक आठवड्याला चार आखीव कागद लिहिण्याची या दैनिकामुळे पडलेली जबाबदारीच पुस्तकाचे लेखन करण्यास साह्यभूत ठरल्याचे मान्य करावेच लागेल.

(संपुर्ण लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात )

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com