Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : केळीची जिओ टॅगिंग नसल्यास विमा योजनेतील सहभाग रद्द

Banana Geo Tagging : केळी पिकासाठी फळ पीकविमा योजनेतून आंबिया बहर अंतर्गत १ ते ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत विमा अर्ज पोर्टलवर किंवा ऑनलाइन सादर करण्यात आले.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत यंदा सुमारे ६२ हजार शेतकऱ्यांनी केळी पिकासंबंधी विमा सरक्षण घेतले आहे. यात विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून विमाधारकांनी केळी पीक पडताळणी किंवा शेतात केळीची जिओ टॅगिंग करून घेणे आवश्यक आहे.

जिओ टॅगिंगला प्रतिसाद न दिल्यास किंवा केळीची जिओ टॅगिंग न केल्यास सबंधित विमाधारकाचा योजनेतील सहभाग रद्द केला जाणार असल्याचे विमा कंपनीने सांगितले.

केळी पिकासाठी फळ पीकविमा योजनेतून आंबिया बहर अंतर्गत १ ते ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत विमा अर्ज पोर्टलवर किंवा ऑनलाइन सादर करण्यात आले.

हे अर्ज सादर करताना विमाधारकांनी केळी लागवडीसंबंधीचे जिओ टॅगिंग केलेले छायाचित्र, सात-बारा उतारा व हेक्टरी साडेआठ हजार रुपये विमा हप्ता विमा कंपनीकडे दिला आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या केळी पीक लागवडीसंबंधीची माहिती किंवा पीक पडताळणी विमा कंपनी करीत आहे.

त्यासाठी विमा कंपनीचे प्रतिनिधी संबंधित गावांत जाऊन गतीने कार्यवाही करीत आहेत. या योजनेत फक्त ज्यांनी शेतात केळीची निर्देशीत क्षेत्रात नमूद केल्याएवढी लागवड केली, त्यांचाच सहभाग कायम ठेवला जाणार आहे. केळी पिकाचे जिओ टॅगिंग करून घ्यावे, असे आवाहन कंपनीने केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Water Grid Project : मराठवाडा वॉटर ग्रीड योजना पुनरुज्जीवित करू

Soybean Procurement : पोर्टल बंद केल्याने रखडली सोयाबीन नोंदणी

Sugarcane Season 2024 : ‘बळीराजा’चे सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Crop Insurance : विमा कंपनी प्रतिनिधीने पैशांची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी

Rabi Season 2024 : नांदेड जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर रब्बी पेरणी

SCROLL FOR NEXT