Transport Minister Pratap Sarnaik Agrowon
ॲग्रो विशेष

MSRTC Employee Salary: शिष्टाचार सोडेन, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत करणार

Transport Minister Pratap Sarnaik: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देत दर महिन्याच्या ७ तारखेला वेळेवर पगार करण्याचे आश्वासन दिले आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होईल, याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल, असे आश्वासन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी (ता. ११) दिले.

दरम्यान, पगारासाठी शिष्टाचार सोडून वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन निधी मंजूर करून आणेन, असेही ते म्हणाले. या महिन्यात केवळ ५७ टक्के पगार एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दरम्यान एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सरनाईक यांनी शुक्रवारी अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. या वेळी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य व परिवहन आयुक्त विवेक भीमनराव, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

सरनाईक म्हणाले, की आर्थिक अडचणीमुळे एसटीत काम करणाऱ्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन केवळ ५६ टक्के देता आले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. यापुढे महिनाभर कष्ट करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा ७ तारखेला त्यांच्या बॅंक खात्यांत जमा करण्यात येईल. मात्र यासोबत एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सकारात्मक सहकार्य अपेक्षित आहे.

यापुढे एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच परिवहन सेवा प्रवासीभिमुख व दर्जेदार करण्यासाठी काही चांगले निर्णय देखील आम्ही घेणार आहोत. त्यामध्ये सर्व बस स्थानकावरील प्रसाधनगृहे ही अत्याधुनिक पद्धतीची स्वच्छ व निर्जंतुक असतील. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बस स्थानकावर व नवीन येणाऱ्या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटण, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणे, या वर भर देणार आहोत.

२५ हजार बसेस येणार

सध्या सर्व जुन्या बसेस स्क्रॅप करण्यात येत असून त्याठिकाणी नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येतं आहेत. यंदा २६४० लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असून त्यापैकी ११३ आगारात ८०० पेक्षा जास्त नवीन बसेस सेवेत रुजू झालेल्या आहेत. सध्या ३ हजार नवीन बसेसची निविदा प्रक्रिया सुरू असून भविष्यात ग्रामीण व दुर्गम भागात उपयुक्त ठरेल अशा मिडी बसेस घेण्यात येणार आहेत. शहरी प्रवाशांसाठी २०० वातानुकूलित शयनयान बसेस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी घेतल्या जातील, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wildlife Conflict: वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांची मान फासात

Environmental Management: इरिओफाइड कोळीचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन

Agarbatti Business: अगरबत्ती उद्योगात तयार केला ब्रॅण्ड

Mission Jalbandhu: रोजगार, जलसुरक्षितेसाठी ‘मिशन जलबंधू’

Weekly Weather: उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT