Nana Patole Agrowon
ॲग्रो विशेष

Nana Patole : "मी इथे खुर्च्या उबवायला आलेलो नाही" - नाना पटोले

A Leader Fighting for Farmers : लोकसभेत नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी जबाबदार कोण, असा प्रश्न केला होता. पण उत्तर न मिळाल्यामुळे ते निराश झाले. "मी इथे खुर्च्या उबवायला आलेलो नाही," असे ते म्हणाले आणि याच कारणामुळे त्यांनी २०१७ मध्ये त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमधून बाहेर पडले.

Team Agrowon

Political Conclave : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे त्यांच्या आक्रमक आणि विद्रोही स्वभावासाठी ओळखले जातात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच सरकारला धारेवर धरले आहे. नाना पटोले यांनी खासदार असताना शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवला होता. लोकसभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी जबाबदार कोण, असा प्रश्न केला होता. पण उत्तर न मिळाल्यामुळे ते निराश झाले. "मी इथे खुर्च्या उबवायला आलेलो नाही," असे ते म्हणाले आणि याच कारणामुळे त्यांनी २०१७ मध्ये त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमधून बाहेर पडले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या समस्या गंभीर आहेत. दररोज सरासरी ८ शेतकरी आत्महत्या करत आहेत, आणि २०२३ मध्ये एकूण २,८५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे आकडे उपलब्ध आहेत. या आत्महत्यांचे कारण कर्जबाजारीपणा, खराब हवामान, पीक नुकसानीमुळे निर्माण झालेली आर्थिक संकटे आणि पिकांना मिळणारा रास्त भाव नाही, हे आहे.

दुष्काळ, अतिवृष्टी, पीक विम्याची अपुरी भरपाई आणि शेती उत्पादनांचे कमी दर या राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रमुख समस्या आहेत. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते आणि या कर्जाच्या भारामुळे आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याचे आश्वासन दिले होते, पण प्रत्यक्षात उलट घडले असून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिकच बिकट झाली आहे.

नाना पटोले यांनी शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, आणि शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. पटोले म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर कोणीही उत्तर देत नाही. पिकांना भाव मिळत नाही, कर्जमाफी होत नाही, आणि शेतकरी आत्महत्यांच्या घटनांवर सरकार मौन बाळगत आले आहे."

काँग्रेसची भूमिका

काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी आणि पीक विमा योजनेत सुधारणा करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करून त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खालील उपाययोजना करेल :

संपूर्ण कर्जमाफी : काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी पूर्वीच्या निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांच्या कर्जाचा भार कमी करण्यासाठी आणि आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची योजना महत्त्वपूर्ण ठरेल.

पीक विमा योजनेत सुधारणा : शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेत पारदर्शकता आणणे आणि विमा मिळण्याच्या प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीसाठी योग्य भरपाई देण्याचे आश्वासन देते.

शेतीसाठी अनुदान आणि मदत : महाविकास आघाडीने आधीच आश्वासन दिले आहे की, शेतीसाठी अधिक अनुदान दिले जाईल. यामध्ये बी-बियाणे, खते, आणि सिंचनासाठी विशेष योजना सुरू केल्या जातील.

शेतमालाला हमीभाव : शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना हमीभाव मिळावा, यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले आहे. विशेषतः साखर कारखाने आणि इतर कृषी आधारित उद्योगांमधून शेतमालाचा योग्य भाव देण्यासाठी ठोस धोरणे तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.

दुष्काळ व्यवस्थापन आणि सिंचन प्रकल्प : महाराष्ट्रात दुष्काळ हा शेतकऱ्यांसाठी एक गंभीर समस्या आहे. महाविकास आघाडी सिंचन प्रकल्पांवर भर देऊन दुष्काळग्रस्त भागांत अधिक प्रभावी पाणीपुरवठा यंत्रणा उभी करेल.

आधुनिक शेती आणि तंत्रज्ञानाचा वापर : शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरे आणि तांत्रिक सल्ला देण्यासाठी योजनाही महत्त्वपूर्ण ठरेल.

महाविकास आघाडी सत्तेत आल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी या सर्व योजना राबवल्या जातील, ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल आणि आत्महत्या टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

SCROLL FOR NEXT