Fisheries Agrowon
ॲग्रो विशेष

भूक आणि मासेमारी

मग त्या सुटेड बुटेड प्रोफेशनलने त्याला फिशिंग रॉड दिला आणि सांगितले की, तू मासे पकडायला शिक , सहनशक्ती वाढव, स्वतः मासे खा, बाकीचे मासे मार्केटमध्ये विक; सरकारकडे कसली भीक मागतोस; आत्मसन्मान ठेव की जरा...'

संजीव चांदोरकर

‘एक मध्यमवर्गीय प्रोफेशनलकडे एक माणूस मला भूक (Hunger) लागलीय मासा विकत घ्यायचाय म्हणून पैसे मागायला आला. नाही तर सरकारच्या वेल्फेअर योजनेतून (Welfare Scheme) मदत मिळवून द्या म्हणाला. मग त्या सुटेड बुटेड प्रोफेशनलने त्याला फिशिंग रॉड (Fishing Rod) दिला आणि सांगितले की, तू मासे पकडायला (Fishing) शिक , सहनशक्ती वाढव, स्वतः मासे खा, बाकीचे मासे मार्केटमध्ये विक; सरकारकडे कसली भीक मागतोस; आत्मसन्मान ठेव की जरा...' ही काल्पनिक नीतिकथा दहा लाख वेळा ऐकली असेल. प्रत्येक मॅनेजमेंट स्कूलमध्ये, मध्यमवर्गीय गप्पांमध्ये, सोशल मीडियावर ती सांगितली जात असते.

इथे फिशिंग रॉड म्हणजे विविध प्रकारची उत्पादन साधने. मासे म्हणजे विक्रीयोग्य वस्तुमाल व सेवा आणि अर्थात लेबर इंटेन्सिव्ह ॲक्टिव्हिटी, स्वतः कष्ट घेणे वगैरे. त्यात तत्त्वतः गैर काहीच नाही. मुळात या गोष्टीत असे गृहीत आहे की खालच्या पायरीवरच्या (बॉटम ऑफ पिरॅमिड) कोट्यवधी सामान्य स्त्री-पुरुषांना कष्ट घ्यायला नकोत; सगळे भीक मागतात नाही तर सरकारकडून लोककल्याण. कोट्यवधी कष्टकऱ्यांचा अपमान करणारं हे गृहितच आहे.

नवउदारमतवाद ‘फिशिंग रॉड'सारख्या स्टोरीज पसरवतो आणि मागच्या दाराने समुद्रातील मासे कॉर्पोरेटच्या यांत्रिक बोटींना काढून घ्यायला परवानगी देतो, दिवसाढवळ्या. फिशिंग रॉडवाला हातात गळ घेऊन बसतो. ना खायला मासे ना विकायला.

स्वयंसहायता गटातील कोट्यवधी महिलांना विचारा: काय बदल झालेत? गेल्या ३० वर्षांपासून त्या ज्या वस्तू तयार करून विकत होत्या त्यात आता मोठे कॉर्पोरेट कसे उतरले आहेत? शेतकऱ्यांना विचारा: शेती क्षेत्रात किती आणि कोठे कॉर्पोरेट शिरत आहेत? मच्छिमार बांधवांना विचारा: यांत्रिक बोटींची संख्या वाढतेय का?

रिटेल क्षेत्रातील दुकानदारांना विचारा: इ कॉमर्स कॉर्पोरेट बद्दल. स्वतः उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कॉलेजच्या तरुणांना विचारा: त्यांना कोणाशी विषम स्पर्धा करावी लागते? हे जंगलराज आहे. ‘बळी तो कान पिळी'वाले जंगल राज. मोठे भांडवल सर्व प्रकारच्या छोट्या भांडवलाला घुसमटवून मारून टाकत आहे. आणि हे सर्व काही प्रचलित कायद्यानुसार होत आहे.

‘फिशिंग रॉड'चे लेक्चर देणाऱ्यांना जमिनी सत्य माहीत असतात आणि याच लेक्चर देणाऱ्या लोकांचे यांत्रिक बोटींच्या कंपनीत भागभांडवल देखील असते. आर्थिक धोरणे ठरवणे, अनिष्ट व्यापार प्रथांना रोखणे, कॉर्पोरेट भांडवलकेंद्री नव्हे तर रोजगार/ स्वयंरोजगारकेंद्री नीती अमलात आणणे हे फक्त आणि फक्त शासनाचे काम आहे. तुम्हाला सांगितल्या गेलेल्या प्रत्येक आर्थिक धोरणाला/ स्टोरीला /तत्वाला भिंगाखाली धरून त्याचे शवविच्छेदन करायला शिका. आपला मेंदू ओरिजनल विचार करण्यासाठी वापरूया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan: रब्बी पीककर्ज वितरण संथ गतीने

Mushroom Processing: अळिंबीचे २४ नवे प्रकल्प

Soil Health: मराठवाड्यातील जमिनीमध्ये नत्र, स्फुरद अन्नद्रव्यांची कमतरता

Maize MSP: हमीभावाने मका खरेदी सुरू

Weather Update: चार दिवस थंडी कमी राहणार

SCROLL FOR NEXT