Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसामुळे शेकडो संसार उघड्यावर

Rain Update : डहाणू तालुक्यात गुरुवारी (ता. १६) दुपारी आलेल्या वादळी वारा, अवकाळी पावसाने ५२६ घरांचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Mumbai News : डहाणू तालुक्यात गुरुवारी (ता. १६) दुपारी आलेल्या वादळी वारा, अवकाळी पावसाने ५२६ घरांचे नुकसान झाले आहे.

कासा, चारोटी, वेती वरोती, मुरबाड, वांगरजे, पिंपळशेत, बापगाव, तवा अंबोली, धानिवरी, सायवन या परिसरातील अनेक घरांची छपरे उडाली आहेत. या वादळाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती.

कासा-चारोटी, तसेच सायवन-कासा मार्गावर मोठी झाडे पडल्याने दोन ते तीन तास कोंडीचा सामना करावा लागला. यात विजेचे खांब, तारा पडल्याने वीजपुरवठादेखील गायब झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते.

त्यात प्रशासकीय अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या कामात मग्न असल्याने नुकसानग्रस्त घर, शेत नुकसानीचे पंचनामे करावयास वेळ लावत आहेत.

या पावसाने घरातील जीवनावश्यक वस्तू, साहित्य, कपडेलत्ते, अन्नधान्य भिजले आहे. त्यात वीज नसल्याने पाण्याचीदेखील मोठी अडचण निर्माण झाली आहे. डहाणूच्या या भागात उन्हाळी भातशेती केली जाते. या पावसाने हातात तोंडात आलेला घास हिरावून घेतला आहे, असे शेतकरी म्हणत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Winter: राज्यात थंडीची लाट; राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता

Balloon Barrage: बलून बंधारे प्रकल्पाला मिळेना निधी

Progressive Farming: चित्तलवाडी येथे प्रगतिशील शेतीची पाहणी

MahaVistar AI App: एआय ॲपच्या उत्कृष्ट वापरासाठी शेतकऱ्यांचा सन्मान

Fertilizer Stock India : देशातील युरियाची विक्री वाढली; डीएपीची विक्री घटली, खतांचा साठा पुरेसा असल्याचा सरकारचा दावा

SCROLL FOR NEXT