Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Micro Irrigation Project : झापाचीवाडी लघू प्रकल्पामुळे शेकडो एकर क्षेत्र ओलिताखाली

Agricultural Development : अनेक वर्षे पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या धामणी परिसरातील झापाचीवाडी (ता. राधानगरी) येथील लघू पाटबंधारे प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षी पूर्णक्षमतेने भरल्याने येथे ऊस पीक लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.

Team Agrowon

Kolhapur News : अनेक वर्षे पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या धामणी परिसरातील झापाचीवाडी (ता. राधानगरी) येथील लघू पाटबंधारे प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षी पूर्णक्षमतेने भरल्याने येथे ऊस पीक लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.

अनेक वर्षे तहानलेली शेती सिंचनाखाली आल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे येथे ऊस पीक क्षेत्रात क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे.

राधानगरी तालुक्याचा पश्चिम धामणी परिसर अनेक वर्षे पाण्यासाठी तहानलेला आहे. येथील झापाचीवाडी प्रकल्पाचे कामदेखील निधीअभावी अनेक वर्षे रखडले होते. कॅबिनेट मंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वाला गेला.

त्यामुळे शेकडो एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतकऱ्यांमधून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. अनेक वर्षे तहानलेली येथील शेती सध्या बागायती बनल्याने ऊस पीक क्षेत्रात वाढ झाली आहे. हा प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षीही पूर्णक्षमतेने भरला आहे. त्यामुळे प्रकल्पाखालील शेकडो एकर शेती ओलिताखाली आली असून, उसाची लावण करण्यामध्ये येथील शेतकरी सध्या मग्न आहे.

प्रकल्प अनेक वर्ष निधी अभावी रखडला होता. कॅबिनेट मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सातत्याने प्रयत्न केल्याने प्रकल्प पूर्णत्वाला गेला आहे. गेल्या दोन वर्षांपासून येथे पाणी साठवून केले जात असून येथील लोकांचे हिरव्या शेतीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
बाजीराव कदम, शेतकरी, झापाचीवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT